पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी चांदा ते बांदा योजनेकडे लक्ष द्या : अनुप कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

 
 
चंद्रपूर : चंद्रपूर व सिंधूदुर्ग जिल्हयामध्ये पायाभूत सुविधा निर्मितीसाठी चांदा ते बांदा योजनेच्या प्रत्येक घटकाचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी योजनांचे नियोजन करताना या योजनेच्या मुळ उद्देशाला लक्षात घ्यावे, असे आवाहन नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्हयांमध्ये रिसोर्स बेस्ड डेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांदा ते बांदा योजनेची चंद्रपूर जिल्हयाची आढावा बैठक १९ मार्च रोजी चंद्रपूर येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष चांदा ते बांदा योजना जिल्हा समन्वयक सुनिल धोंगडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नागपूरचे प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
 
या योजनेला २०१६-१७ पासून सुरुवात झाली असून योजनेच्या कामांना शासनस्तरावरुन मंजूरी देण्यात आली असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. तसेच २०१७-१८ चाही आराखडा शासनास सादर केला असून अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर यांनी पर्यटनाबाबत माहितीफलक व प्रसिध्दीची कामे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांच्यास्तरावरुन कामे पुर्ण झाल्यानंतर करण्यात येणार आहे अशी माहिती दिली. या प्रसिध्दीच्या कामाची अंमलबजावणी प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर या स्तरावरुन करण्यात यावी. तसेच प्रसिध्दीकरीता बुकलेट तयार करावे असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
 
 
मधशुध्दीकरण प्रक्रीया करणे व साठवणुकीकरीता रुम बांधणे हे काम केमारा येथे पूर्ण झाले असून मधसंकलन करण्याकरीता मशीनरी व प्रशिक्षणाकरीता लागणारे साहित्यखरेदी करण्याचे काम सुरु असल्याचे उपवनसंरक्षक मध्यचांदा यांनी सांगितले. तसेच हस्तकला व रोजगारनिर्मिती केंद्र तयार करणे याबाबतचे काम गोंडपिपरी येथील काम अंतिम टप्प्यात व रामपूर येथील काम पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@