शेगावनजीक अत्याधुनिक कत्तलखान्याचा घाट?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
विदर्भाची पंढरी असलेले शेगाव, तर जैनांची काशी असलेल्या बाळापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्याचा घाट अल्वाफी अॅग्रोफूड या कंपनीने घातला आहे. दीड वर्षांपूर्वी शासकीय नियमात बसत नसल्याने हा प्रकल्प थांबला होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली आहे. बाळापूर नपने या प्रकल्पाकरिता ना हरकत दिल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

 
अल्वाफी अॅग्रोफूड या नावाने मो. शोएब शे. वजीर कुरेशी याने अत्याधुनिक कत्तलखान्याची परवानगी 6 एप्रिल 2016 ला बाळापूर नपसह विविध विभागांकडे मागितली होती. शोएब याने ज्यावेळी ही परवानगी मागितली त्यावेळी तो अल्पवयीन होता, हे विशेष.
शोएब याच्या नावावरच या प्रकल्पाकरिता मोठी जमीन खरेदी करण्यात आली. अल्पवयीन असतानाही प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत शोएबने ही खरेदी केली. नंतर अल्पवयीन शोएबने खरेदी केलेली जमीन अकृषकही करण्यात आली. जमीन खरेदी आणि अकृषक करताना शासनाची हेतूपुरस्सर फसवणूक करण्यात आली, अशी चर्चा त्यावेळी होती.
2016 साली बाळापूर नगर परिषदेला दिलेल्या अर्जात अत्याधुनिक कत्तलखान्याची परवानगी, तर बांधकाम मंजुरीकरिता नगररचना विभागाला दिलेल्या नकाशात प्रिव्हेन्शन ऑफ मीट, कॅिंनग प्रोसेिंसग ऑफ मीट अॅण्ड सिमिलर फुडस् लाईक फ्रुट्स अॅण्ड व्हिझीटेबल प्लॅन्ट असा उद्देश दर्शविण्यात आला.
शासकीय नियमाच्या अधीन राहून व्यवसाय करण्याची इच्छा असणार्याने एकाच प्रकल्पासाठी शासनाच्या दोन विभागांना वेगवेगळे उद्देश दाखविल्याने प्रकल्प संचालकांचा हेतू प्रामाणिक नसल्याचे त्यावेळी तज्ज्ञांचे म्हणणे होते.
नगररचना विभागाने, या प्रकल्पाला रहिवासी भागात परवानगी देता येणार नाही, असे स्पष्ट करीत त्यावेळी परवानगी नाकारली होती. ज्या पत्राद्वारे नगररचना विभागाने परवानगी रद्द केली त्याच पत्रात प्रिव्हेन्शन ऑफ मीट कॅिंनग प्रोसेिंसग ऑफ मीट अॅण्ड सिमिलर फुड्स लाईक फ्रुट्स अॅण्ड व्हिझीटेबल प्लॅन्ट या उद्देशाकरिता जरी परवानगी मागितली असली तरी नकाशातील एक भाग जनावरांच्या कत्तलीसाठी असल्याचे स्पष्ट केले होते.
नगररचना विभागाने प्रकल्पाकरिता परवानगी रद्द केल्यावर प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयात प्रकरण दाखल करताना प्रकल्पाची ज्याने परवानगी मागितली तो मो. शोएब शे. वजीर याने अर्ज न करता शोएब अल्पवयीन असल्याने त्याच्या वतीने त्याचे वडील शे. वजीर कुरेशी यांनी अर्ज केला. यावरून आधीचे सर्व अर्ज हे अल्पवयीन असलेल्या शोएबने केल्याचे स्पष्ट होते. यावरून अल्वाफीने शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत त्यावेळी विविध फंडे वापरले.
अप्रामाणिकतेच्या पायावर कत्तलखान्याची इमारत उभी राहू नये या करिता वरील विसंगतींचा शासकीय यंत्रणेने आता तरी तपास करावा, अशी इच्छा सामान्यजन व्यक्त करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@