शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : अनकम्फर्टेबल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018   
Total Views |

 
 
आम्हा मुलींना ना अगदी लहान वयापासून 'अनकम्फर्टेबल' व्हायची सवयच होते जणू. त्यात दोष मुलींचा नसतो तर आजू - बाजूच्या वातावरणाचा असतो. आजू बाजू घडणाऱ्या घडामोडींचा असतो. कुणी तरी सतत आपल्याकडे बघतंय या एका भावनेने आपण अस्वस्थ झाला आहात का? कधीतरी असं घडलंच असणार. असेच काहीसे या लघुपटात घडले आहे.
 
ही कहाणी एका सामान्य मुलीची आहे. कथेची गम्मत अशी की, या कथेत एकही संवाद नाही. केवळ डोळ्यांच्या हावभवातून कलाकारांनी प्रत्येक एक भावना चोख व्यक्त केली आहे. एक मुलगी आपल्या मैत्रीणीसोबत एका कॉफीशॉपमध्ये आलेली असते. तिच्या गप्पा, टप्पा, मजा, कॉफी पिणे हे सगळं सुरु असताना तिचं लक्ष अचानक जातं एका मुलाकडे जो सतत तिला एकटक बघत असतो.
 
तिला खूप अस्वस्थ होतं. समजत नाही काय करावं. ती आपले कपडे नीट करते, पुन्हा एकदा सगळं पडताळते पण त्याच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या त्या खिळलेल्याच. तिच्या मदतीला एक मुलगा येतो. अरे नाही नाही.. इथे गफलत करू नका. तो काही नेहमीप्रमाणे हीरोगिरी दाखवायला जात नाही, का त्याच्याशी भांडत नाही का काही नाही.. तो असं काय करतो, जेणे करुन त्या मुलाला अगदी तसंच अस्वस्थ होतं जसं त्या मुलीला झालंय?
 
 
 
 
 
जाणून घेण्यासाठी एकदा तरी हा लघुपट नक्कीच बघा. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि वैभव राजाध्यक्ष यांनी या लघुपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यूट्यूबवर या लघुपटाला २ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. डिजिटल ड्रामा कंपनीतर्फे प्रदर्शित हा लघुपट प्रत्येका मुलीने आणि प्रत्येका मुलानेही नक्कीच बघावा.
 
- निहारिका पोळ 
 
@@AUTHORINFO_V1@@