तळोदा न्यूज नेमसुशिलच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून बचत करून रुग्णांना फळ वाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |
 
 
तळोदा न्यूज नेमसुशिलच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून बचत करून रुग्णांना  फळ वाटप 
 
 
तळोदा -
 येथील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराच्या इ १ ली व 2 री च्या विद्यार्थांनी खाऊच्या पैशातून बचत करून गरीब रुग्णांना फळ वाटप करून नविन आदर्श डोळ्यासमोर ठेवला. केवळ शैक्षणिक वारसा न जपता सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून चिमुकल्या विद्यार्थाना लहानपणा पासूनच बचत करून सत्कर्म कसे करावे याचे धडे घेत विद्यार्थ्यांनी फळ-वाटपाच्या माध्यमातून अनोखा उपक्रम करत गरीब रुग्णाचे आशिर्वाद घेतले .
 
 
याप्रसंगी डॉ. बडगुजर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, तसेच शासकीय आरोग्य यंत्रणा व त्यांचा लाभ इत्यादी गोष्टीवर मार्गदर्शन करत फळ वाटप उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळोदा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील व डॉ. पटले तसेच सदर फळवाटप कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका  सोनाभाभी तुरखिया, मुख्याध्यापिका पी. एच. बागुल मॅडम,  हर्षिल तुरखिया, वाडीले सर, वर्गशिक्षक  खर्डे मॅडम,  सागर सोजल सर,  संतोष पावरा सर,  सचिन पाटील सर,  समाधान मराठे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@