अमळनेरात होणार मागासवर्गीय मुलींचे भव्य वसतिगृहसाडेआठ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता, आ.शिरीष चौधरींच्या पाठपुराव्यामुळे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |
 
 
Turn off for: Marathi
अमळनेरात होणार मागासवर्गीय मुलींचे भव्य वसतिगृह
साडेआठ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता, आ.शिरीष चौधरींच्या पाठपुराव्यामुळे यश
अमळनेर, १४  मार्च 
शहरात मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी 8 कोटी 55 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ.शिरीष चौधरी यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे वसतीगृहाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
अमळनेर येथे चांगल्या शैक्षणिक सुविधा असल्याने बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय मुलींची संख्या देखील अधिक आहे. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व त्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून नवीन वसतिगृहाची निर्मिती व्हावी, यासाठी आ.शिरीष चौधरी हे प्रयत्नशील होते.
पाठपुराव्याला यश
आ.चौधरी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर वसतिगृहाच्या कामाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीच्या १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. आ.चौधरी यांनी सामाजिक व न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.राजकुमार बडोले यांच्याकडे यासंदर्भात दि.१० फेब्रुवारी २०१६ रोजी पत्रान्वये मागणी केली होती. याप्रकरणी मंत्री ना.बडोले यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी याकामासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, असे आदेश प्रधान सचिव यांना २३ फेब्रुवारी २०१६ रोजी दिले होते. आमदार शिरीष चौधरी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सामाजिक न्याय विभागाने या कामास प्रशासकीय मंजुरी दिल्याचा शासन निर्णय १३ मार्च रोजी प्रकाशित करण्यात आला.
चोपडा रस्त्यावर होणार निर्मिती
वसतिगृहाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून चोपडा रस्त्यावरील सिंधी कॉलनीजवळ हे भव्य वसतिगृह उभे होणार आहे.
भाडेतत्वाच्या इमारतीला आमदारांचा होता विरोध
अमळनेरात मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाची मागणी आ.चौधरी यांनी केल्यानंतर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या दालनात दि.९ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत समितीने मांडलेल्या अहवालानुसार सदर ठिकाणी वस्तीगृहाकरिता इमारत भाडेतत्वावर घेण्याचे सूचित केले होते, परंतु आ.चौधरी यांनी त्यास विरोध करून दि.१६ मे २०१७ रोजी सामाजिक न्याय मंत्री ना.बडोले यांना वैयक्तिक भेट देऊन निवेदन दिले होते. सद्यस्थितीत अमळनेर मतदार संघात २०० ते ३०० मुलींची सोय होईल अशी भाडेतत्वावर मिळेल एवढी मोठी वास्तू नाही, तसेच मुलींची सुरक्षेची हमी कोण घेईल हा देखील प्रश्न आहे, त्यामुळे इमारत भाडेतत्वावर न घेता शासनाने नवे स्वमालकीचे बांधकाम केल्यास त्यांचा सांभाळ व निगा राखणे तसेच मुख्यतः मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य दखल घेणे सोयीचे होईल, पुढील शैक्षणिक वर्षात मुलींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नवीन वसतिगृहाचे बांधकामच करावे अशी मागणी आ.चौधरी यांनी केली होती. त्यामुळेच हि मंजुरी मिळाली आहे.
प्रस्तावित काम लवकरात लवकर मार्गी लावणार - आ.चौधरी
चोपडा रस्त्यावर असलेल्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाची क्षमता ७५ वरून १०० पर्यंत वाढविणे, अमळनेर तालुक्यात आदिवासी मुलींकरिता नवीन वसतिगृह बांधणे, आदिवासी विद्यार्थ्यांकरिता क्रीडा संकुलाच्या बांधकामास प्रशासकीय मंजूरी मिळण्याकामी शासनास निवेदन दिले असून तीनही कामांचा पाठपुरावा सुरू आहे. सर्व प्रस्ताव मार्गी लागल्यास हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना भविष्यातही शैक्षणिक व क्रीडा सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.शिरीष चौधरी यांनी सांगितल
@@AUTHORINFO_V1@@