शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्याचे कार्यालय प्रमुखांना आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |
 
 
 
 

 
 
 
अति. जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांचे आदेश
 


चंद्रपूर : सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, अंतर्गत अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कंलत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालये तंबाखू मुक्त करण्यासाठी "तंबाखूयुक्त पदार्थाचे सेवन व COTPA कायद्याची अमलबजावणी" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
 
 
 
या कार्यशाळेत जिल्हा सल्लागार NTCP डॉ कैलाश नगराळे,तसेच दंत चिकित्सक डॉ संदीप पिपरे यांनी "तंबाखूचे सेवन,त्याचे दुष्परिणाम, COTPA कायदा व त्याची अमलबजावणी" यावर चित्रफितीच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले.
 
 
 
 
अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखू युक्त पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात (३४ %) असून अगदी शाळकरी मुलांपासून तर वृद्धापर्यंत मोठ्या प्रमाणात लोक तंबाखूच्या दुष्परिणामांचे बळी पडलेले आहेत. त्यामुळे सर्व कार्यालय प्रमुखाना आपले कार्यालय तसेच शैक्षणिक संस्था, शाळा, तंबाखू मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच प्रमाणे पानठेला चालकांनी १८  वर्षांखालील मुलांना तंबाखू युक्त पदार्थ विकणे कायद्याने गुन्हा आहे " असे फलक लावण्याच्या सूचना दिल्या.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@