जमीन अधिग्रहणातून मिळालेला मोबदला शेतीमध्येच गुंतवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |

पालकमंत्री येरावार यांचा सल्ला




यवतमाळ :
आपल्या हक्काची जमीन ही शेतकऱ्याला आपल्या आई प्रमाणेच असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी राज्याच्या विकासकामासाठी दिल्या आहेत. त्यांनी यामधून मिळालेला मोबदला हा शेतीमध्येच गुंतवावी, असा सल्ला राज्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिला आहे. जिल्हा‍धिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शेतक-यांना धनादेश वाटप करतांना ते बोलत होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ करिता जिल्ह्यातील शेतक-यांनी कोणतेही आंदोलन न करता विकासात आपले योगदान दिले आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील शेतक-यांनी स्वखुशीने जमिनी दिल्या. शासनानेसुध्दा अतिशय चांगला मोबदला शेतक-यांना दिला आहे. त्यामुळे अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यातून शेतीमध्ये गुंतवणूक केली तर अधिक चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो, असे येरावार यांनी म्हटले.
नुकताच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यात कृषी क्षेत्रासाठी ६३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गटशेती, सेंद्रीय शेती, जलयुक्त, धडक सिंचन, कृषी पंप वीज जोडणी, शेतमालाला किंमत, उत्पादीत शेतमाल साठवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आदींचा यात समावेश आहे. शेतीवर आजही ५० ते ६० टक्के नागरिकांची उपजिविका आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतक-यांना स्वाभिमानाने उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@