उर्जा क्षेत्रात भारत-फ्रांस लिहिणार नवा अध्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2018
Total Views |

आंतरराष्ट्रीय सौर उर्जा परिषदेचे आजपासून उद्घाटन

तब्बल २३ देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि १२१ देशांचे प्रतिनिधी घेणार सहभाग





नवी दिल्ली :
भारत-फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरु करण्यात आलेल्या सोलर अलायन्स कार्यक्रमाअंतर्गत जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सौरउर्जा परिषदला आजपासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती भवन येथे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मैक्रॉन यांच्या या परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

उर्जा क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी घेण्यासाठी तसेच जगभरातील इतर देशांना देखील उर्जा क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ही भारत फ्रांसकडून सुरु करण्यात आली आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी अनेक देशांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. भारत-फ्रांसच्या निमंत्रणावरूनच या तीन दिवसीय परिषदेसाठी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि श्रीलंकेसह एकूण २३ देशांचे राष्ट्राध्यक्ष, १० देशांचे मंत्री आणि तब्बल १२१ देशांचे प्रतिनिधी आज नवी दिल्लीमध्ये उपस्थित झाले आहे. यासर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या परिषदेचे उद्घाटन होणार असून यानंतर या मोहिमेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या उर्जा क्षेत्रात अमेरिका आणि चीन यांच्या दबदबा आहे. त्यामुळे भारत आणि फ्रांस या दोन देशांनी सुरु केलेल्या या सोलर अलायन्सकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सौर उर्जेच्या माध्यमातून भारत सध्या वर्षाला २० हजार मेगावॉट ऐवढी वीज निर्मिती करत असून २०२२ पर्यंत हा आकडा १०० गीगावॉटपर्यंत घेऊन जाण्याचा भारताचा मानस आहे, यादृष्टीने भारत अत्यंत वेगाने काम करत लवकरच भारताचे हे ध्येय देखील साध्य होईल, असे भारत सरकारकडून या कार्यक्रमाविषयी सांगण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@