देशाच्या 95 टक्केजिल्ह्यांमध्ये संघाचे अस्तित्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |

 
 
 
 
-गेल्या वर्षी दीड लाख स्वयंसेवकांना प्रशिक्षण
- अ. भा. प्रतिनिधी सभेचा शुभारंभ
-कृष्णगोपाल यांचा माध्यमसंवाद
मणिपूर, मिझोरम आणि जम्मू-काश्मिरातील काही जिल्हे वगळता देशातील 95 टक्के जिल्ह्यांमध्ये संघकार्य चालते. मागील वर्षी 1,266 ठिकाणी 1 लाख 43 हजार 596 स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले गेले, अशी माहिती रा. स्व. संघाचे अ. भा. सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी आज, शुक्रवारी दिली.
ते म्हणाले, अ. भा. प्रतिनिधी सभा आज सुरू झाली. सरकार्यवाह या सभेत मागील वर्षीच्या संघकार्याची माहिती देतात. देशातील 95 टक्के जिल्ह्यात संघकार्य चालते आणि या सर्व भागातून प्रतिनिधी या सभेला येतात. संघ परिवारातील 35 संघटनांमध्ये कार्यरत पदाधिकारी, स्वयंसेवक असे 1538 जण या प्रतिनिधी सभेला अपेक्षित आहेत. त्यात 25 पदाधिकार्‍यांचाही समावेश आहे.
देशभरात 37 हजार 190 ठिकाणी 58,967 शाखा लागतात. याशिवाय 16 हजार 405 साप्ताहिक मिलन, 16 हजार 405 मासिक मिलन, या निमित्ताने एकूण 83,348 स्वयंसेवक सहभागी झाले.
संघ स्वयंसेवकांना प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात प्रशिक्षण दिले जाते. 20 व 25 दिवसांचे हे वर्ग असतात. मागील वर्षी 86 ठिकाणी झालेल्या ओटीसींमध्ये 24 हजार 139 स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले. याशिवाय सात दिवसांचे 1180 ठिकाणी प्राथमिक प्रशिक्षण वर्ग झाले. त्यात एकूण 1 लाख 19 हजार 457 स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले. अधिकांश 30 ते 35 वर्षांच्या 95 हजार 318 तरुणांनी वर्गांमध्ये सहभाग घेतला. असे प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक राष्ट्रीय कार्यात विविध विधांमध्ये सहभागी होतात व संघकार्य विस्तारित करतात.
आसाममधील गुवाहाटी येथे 21 जानेवारीला आयोजित संमेलनात तेथील 31 हजार 351 स्वयंसेवक पूर्ण गणवेशात उपस्थित होते. विविध आदिवासी जाती-जनजातींमधील 80 हजार स्वयंसेवकही उपस्थित होते. जनजातींमधील संत, नेते, महंत आदींचाही सहभाग होता. हा एक विक्रमच होता, असेही कृष्णगोपाल म्हणाले. संघाचे अ.भा. प्रचार-प्रसार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य, सह प्रचार-प्रसार प्रमुख नरेंद्र ठाकूर व्यासपीठावर उपस्थित होते.
------
चौकट
बोली भाषांचे संवर्धन व्हावे; संघाचा प्रस्ताव
देशातील बोली भाषा नामशेष होत चालल्या असून, त्यांच्या संवर्धनाविषयी काय करता येईल, यासंबंधी या प्रतिनिधी सभेत प्रस्ताव मांडला जाणार आहे. देशभरात हजारो बोली भाषा आहेत. इतर भाषांना व्याकरण, लिपी मिळाली. बोली भाषांमध्येही कथानक, काव्य, साहित्य, नाट्ये आहेत. दुर्लक्ष झाल्याने या भाषा नामशेष होत चालल्या आहेत. देशातील महान परंपरा सुरक्षित जपून ठेवायला हव्यात, त्यासाठी बोली भाषा समृद्ध व्हायल्या हव्यात, असा विचार पुढे आला आहे. त्यामुळे या प्रतिनिधी सभेत यासंबंधी विशेष प्रस्ताव ठेवला जाणार आहे. संघ येत्या काळात शेतकर्‍यांसाठीही काम करणार आहे. देशातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, त्या दिशेने प्रयत्न आहेत. आयटीच्या क्षेत्रांतील तरुणांचा कल संघाकडे वाढतो आहे आणि महानगरांमध्ये संघाचे काम खोलवर रुजावे यासाठी मुंबई, कोलकाता, बंगळुरू, पुणे, नाशिक यासारख्या महानगरांत विशेष कार्य आरंभ केले जाईल.
@@AUTHORINFO_V1@@