धुळे जिल्ह्यातील रेल्वेस्थानकांचे रुप पालटणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |

 

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची शिंदखेडा येथे ग्वाही


 
धुळे :
धुळे, दोंडाईचा, नरडाणा आणि शिंदखेडा रेल्वे स्थानकांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल. या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुविधा पुरविण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
 
 
चेन्नई- अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेसला शिंदखेडा येथील रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी होती. याबाबत ना. डॉ. भामरे यांनी पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर आजपासून हा थांबा मंजूर झाला. आज सकाळी नवजीवन एक्स्प्रेसचे शिंदखेडा रेल्वेस्थानकावर मंत्री डॉ. भामरे यांनी स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
यावेळी शिंदखेड्याच्या नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, तहसीलदार सुदाम महाजन, सलिम नोमाणी यांच्यासह नागरिक, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. भामरे म्हणाले, नवजीवन एक्स्प्रेसला शिंदखेडा येथे थांबा मिळावा, अशी मागणी प्रवासी संघर्ष समितीने केली होती. याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. त्यांना सर्व माहिती दिली.
 
 
याबाबत राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशीही चर्चा झाली होती. यापार्श्वभूमीवर आजपासून नवजीवन एक्स्प्रेसला थांबा मंजूर झाला आहे. शिंदखेडा येथे थांबा मिळाल्यामुळे अहमदाबाद व चेन्नईकडे जाणार्‍या प्रवाशांची सोय झाली आहे. ताप्तीगंगा व प्रेरणा एक्स्प्रेसलाही शिंदखेडा येथे थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
यावेळी निकम, नोमाणी यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. नवजीवन एक्स्प्रेसला शिंदखेडा येथे थांबा मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर मंत्री डॉ. भामरे यांनी शिंदखेडा रेल्वे स्थानकावरील विविध विकास कामांची पाहणी
केली. यावेळी नागरिक, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

मूलभूत सोयीसुविधा पुरविल्याचा दावा - भुसावळ-सुरत लोहमार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. शिंदखेडा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात आली आहे. प्रवांशासाठी प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्यात आले आहेत. दोन्ही प्लॅटफॉर्मला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आला असून प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत, असेही मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@