अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत ३ योजना कार्यान्वित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
भंडारा : राज्यातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणवर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टिने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत तीन नवीन योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. सदर योजनेच्या अंमलबजावणीकरीता किरण पटवर्धन निरिक्षक अण्णाभाऊ पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेतली. तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा येथील अधिकारी व कर्मचारी यांना नवीन योजनेबाबत मार्गदर्शन केले.
 
 
 
महामंडळाच्या ३ नवीन योजना
 
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना यासाठी पात्रता सर्व प्रवर्गातील आर्थिक मागास उमेदवारांकरीता या योजना असून उमेदवार १८ ते ४५ वयोगटातील असावा व त्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे असे सांगण्यात आले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@