मुलींच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करा - विनीता साहू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुलीच्या जन्माचे स्वागत सप्ताहाचा समारोप 
 

भंडारा : मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे लागते ही काळाची गरज आहे, कारण आज मुलामुलींचे गुणोत्तर प्रमाणात घट झाली आहे. जिल्हयात हा अभिनव कार्यक्रम आयोजित करुन मुलींच्या जन्माचे प्रमाण आपणास वाढवावयाचे आहे, हा संदेश राज्यात सर्व दूर पर्यंत पोहचवायचा आहे. मुलीचा जन्म घेवून आज मी या पदावर आहे. याबद्दल मला अभिमान आहे. म्हणून मुलींना जगू दया, शिकु दया व सक्षम करुन मुलीच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी केले. 
 
 
 
मुलीच्या जन्माचे स्वागत या सप्ताहाचा समारोप जिल्हा परिषद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. माझा आयुष्यात वडिलांचे फार सहकार्य मिळाले आहे. प्रत्येक पालकांनी सुध्दा आपल्या मुलीस असेच सहकार्य करावे. गर्भलिंग तपासणी, गर्भपात थांबले पाहिजे. मुली सुध्दा सर्व क्षेत्रात सक्षम आहेत, ही जणिव समाजात निर्माण झाली पाहिजे. समाजाने मुलींना त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रोत्साहन व संरक्षण देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
 
 
आजच्या मुली अबला नसून सबला आहेत. तीचे मनोधैर्य वाढविण्यावर भर दया. मुलींना वाईट नजनेतून पाहू नये, असे पालकांनी मुलांना सांगावे. त्यासाठी परीवर्तन आवश्यक आहे. मुली व मूले समान आहेत ही भावना त्यांच्यात निर्माण करणे गरजेचे आहे. मुलींचे घरुन पळून जाण्याचे प्रमाण जिल्हयात फार आहे. तसेच पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने कार्यशाळा व फिरते पोलीस स्टेशनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. प्रेम, आदर, व जगण्याचे स्वातंत्र घरात मिळाल्यास मुली पळून जाणार नाहीत. मुलींना आपुलकीने वागविण्याची जाबाबदारी कुटुंबाने स्विकारावी. विविध क्षेत्रात जागतिक पातळीवर मुलींनी देशाचा गौरव वाढविला आहे. जिल्हयातही महिला अधिकाऱ्यांची संख्या चांगली असून नागपूर विभागात ३ जिल्हा पोलीस अधिक्षक महिलाच आहेत. ही महिलांसाठी गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 
@@AUTHORINFO_V1@@