सकारात्मक सोशल मिडीयाच्या वापरासाठी ‘महामित्र’चा प्रयोग - डॉ.माधमशेट्टीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
चंद्रपूर: महाराष्ट्र शासनाच्या ‘महामित्र’ ॲप डाऊनलोड करण्याच्या उपक्रमाला चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.माधमशेट्टीवार यांनी सकारात्मक सोशल मिडीयाच्या वापरासाठी महामित्रचा प्रयोग महत्वपूर्ण असून यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
 
राज्य शासनातर्फे आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक कार्यासाठी उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देवून विवेकशील समाज घडविण्यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र उपक्रम’ राबविण्याचा निर्धार केला आहे. या अंतर्गत सद्या १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत महामित्र ॲप डाऊनलोड करण्यासाठी तरुणांना आवाहन करण्यात येत आहे.
 
 
देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉट्ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अनेक विषय पुस्तकांमधून वाचण्याऐवजी मोबाईलवर वाचन करण्याची सवय विद्यार्थ्यांना होत आहे. हळहळू हा मिडीया अधिक सशक्त होत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आता या माध्यमाला अभ्यासाचे माध्यम बनवले आहे. त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची ताकद जाणून ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रम राबविण्याचा ठरविले आहे. 
@@AUTHORINFO_V1@@