१७ फेब्रुवारी पर्यंत कर्करोग पंधरवड्याचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |
 
 
जिल्हयात ९३ कर्करुग्ण
 
 
भंडारा : ४ ते १७ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत कर्करोग पंधरवडा साजरा होत आहे. या पंधरवड्याचे आयोजन सामान्य रुग्णालय भंडारा येथे करण्यात आले असून कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. धकाते यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोग किती गंभीर रुप घेवू शकतो तसेच तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थापासून कसे अलिप्त रहावे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सांगता तंबाखू विरोधी शपथ घेवून करण्यात आली.
 
 
या कर्करोग पंधरवाडा कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी यांची कार्यशाळा तसेच पोलीस विभागासोबत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांतर्गत रांगोळी, निबंध, पोस्टर अशा विविध स्पर्धांचे अयोजन करण्यात आले आहे.
 
 
राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम २०१२-१३ पासून सुरु झालेला आहे. या अंतर्गत तंबाखू नियंत्रण कक्ष तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन करत आहे. तसेच जिल्हा समान्य रुग्णालयात जवळ तंबाखू बाळगल्यास व खातांना आढळल्यास त्यांच्याकडून २०० रुपये चालान फाडल्या जाते. तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम कसे होतात याविषयी जागृती निर्माण करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी शिबीर आयोजित करुन सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करुन गाव व परिसर तांबाखूमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@