पोलीस कर्मचार्‍याकडून बालिकेची छेड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
शिरपूर : तालुक्यातील थाळनेर येथे एका पोलीस कर्मचार्‍याने भारतीय सैन्य दलातील जवानाच्या १० वर्षीय बालिकेची छेड काढल्याच्या कारणावरून जमावाने त्याा कर्मचार्‍यास चोप दिल्याची घटना सोमवारी घडली.
 
थाळनेर पोलीस स्टेशनचे वाहन चालक नासिर जाकीर पठाण याने गावात राहणार्‍या भारतीय सैन्य दलातील जवानाच्या १० वर्षीय मुलीची छेडखानी केली. ही घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कळताच संतप्त ग्रामस्थ गोळा झाले. मुलीच्या आजीनेही संबंधित कर्मचार्‍यास चोप दिला.
 
संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावरही दगडफेक केली. त्यात काचा फोडण्यात आल्या. त्या पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमाव पोलीस स्टेशनबाहेर ठाण मांडून बसला. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी य योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्या नंतर जमाव शांत झाला. गावात एसआरपीची तुकडी दाखल झाली आहे. पोलीस ठाण्यात सरपंच प्रशांत पाटील, मुलीचे वडील, आजी, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, डीवायएसपी संदीप गावीत बसले असून पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती.
 
@@AUTHORINFO_V1@@