आदिवासी विद्यार्थ्यांनाही मिळणारनामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
Turn off for: Marathi
आदिवासी विद्यार्थ्यांनाही मिळणार
नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश
तळोदा, २७ फेब्रुवारी
येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे येत्या शैक्षणिक वर्षाकरिता आदिवासी मुलांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमांतील निवासी शाळेत प्रवेश देण्यासाठी १मार्च ते १५ एप्रिलपर्यत प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रकल्पाधिकार्‍यांनी दिली आहे.
 
 
प्रवेशासाठी पालकांनी तळोदा प्रकल्प आणि तळोदा, अक्कलकुवा, धडगांव गटसाधन केंद्र येथून प्रवेश अर्ज विनामूल्य घेऊन तळोदा प्रकल्प कार्यालयात परिपूर्ण भरून कागदपत्रांसह जमा करावे असे आवाहन प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे
 
अर्जासोबत विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो, पालकांचा/ विद्यार्थ्यांचा अनु. जमातीचा दाखला, २०१६-१७ चा उत्पन्नाचा दाखला, शासकीय व निमशासकीय नोकरी नसल्याबाबतचे पालकांचे प्रतिज्ञापत्र, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, ऑनलाईन ग्रामसेवकाचा दाखला जोडावा. विद्यार्थ्याचे वय ५ वर्षे ८ महिने पूर्ण असावे आणि त्याचा जन्म १ जून २०१२ ते ३१ जाने. २०१३ दरम्यान झालेला असावा.
 
दारिद्रयरेषेखालील असल्याबाबतच ग्रामसेवकाचा दाखला, महिला पालक असल्यास व ती विधवा असल्यास (वडिलांचा मयत दाखला)/घटस्फोटित/ निराधार/ परित्यक्ता असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र याचा लगतच्या काळातील विद्यार्थ्यांचा वैद्यकीय दाखला, प्रकल्पग्रस्त असल्यास सक्षम अधिकार्‍याचा दाखला, विद्यार्थी व आई-वडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, रहिवासी दाखला, विद्यार्थी अपंग असल्यास ऑनलाईन जिल्हा चिकित्सकांचा प्रत दाखला झेरॉक्स, विद्यार्थी अनाथ असल्यास आई-वडील यांचे मृत असल्याचा दाखला अर्जासोबत जोडावा. कागदपत्र अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ आदी अस्थापणावर सेवेतील कर्मचार्‍यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे
 
@@AUTHORINFO_V1@@