बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 

भंडारा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र भंडारा मार्फत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील बेरोजगारासाठी बीज भांडवल योजना राबविल्या जाते. दुर्बल घटकातील बेरोजगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.
 
 
 
या योजनेअंतर्गत अर्जदाराला ५  लाख रुपयांपर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरीता अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. या मध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग ६० टक्के असून अर्जदारास ५ टक्के रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या ३५  टक्के रक्कमेवर महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते. या ३५  टक्के रकमेवर ४  टक्के व्याज आकारण्यात येते. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी ५  वर्षाचा आहे. ज्या प्रवर्गाकरीता कोणतेही महामंडळ कर्ज उपलब्ध करुन देत नाही. अशा उमेदवारांना या महामंडळातर्फे कर्ज पुरवठा केला जातो.
 
 
 
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती या प्रमाणे आहेत. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याचे जिल्हयात मागील ३  वर्ष स्थायी वास्तव्य असावे. वय १८   ते  ४५  असावे. अर्जदाराचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदविलेले असावे. वार्षिक उत्पन्न ६  लाख रुपयाच्या आत असावे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@