सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण वर्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |

औरंगाबाद : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी एसएसबी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या प्रशिक्षण वर्गात सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकारी यांच्याकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हीसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीव्दारे सैन्य दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक व युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.
 
प्रशिक्षण वर्गाचा कालावधी १३ मार्च २०१८ ते २२ मार्च २०१८ (एकूण १० दिवस) असा असणार आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची, प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामुल्य करण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गातील प्रवेशासाठी १२ मार्च २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर नाशिक रोड, नाशिक येथे पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींसह मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५३- २४५१०३१ व २४५१०३२ यावर कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संपर्क साधावा.
 
एसएसबी प्रवेश वर्गसाठीची कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. त्यामध्ये कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी (सी) सर्टिफिकेट बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे, अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. तरी वरील प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त पात्र महाराष्ट्रीयन तरुण, तरुणींनी लाभ घ्यावा, असे प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांनी आवाहन केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@