भंडारा जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हायटेक करणार-चंद्रशेखर बावनकुळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 
 
 
 

पोलीस टेक एक्स्पोचे उदघाटन
भंडारा शहरात सिसिटीव्हीचे जाळे
एक महिन्यात ग्रामरक्षक दलाचे गठण
 

भंडारा :  पोलीसांच्या सक्षमीकरणासोबतच जनतेचे संरक्षण महत्वाचे असून पारंपारिक गुन्हे पध्दतीत आमुलाग्र बदल झाला असल्याने जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून पोलीस विभागाच्या आधूनिकीकरणासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
 
 
जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने शिवाजी स्टेडियम येथे आयोजित टेक एक्स्पो २०१८  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. सायबर गुन्हेगारी, क्राईम, क्रिमीनल ट्रकिंग नेटवर्क सिस्टम, ऑनलाईन तक्रार व महिला विषयक गुन्हे बाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
 
 
 
 
या प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, भंडारा पोलीस दलाने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहे. टेक एक्स्पो हे प्रदर्शन पोलीसांच्या आधुनिकीकरणाचे महत्व विषद करणारे आहे.  भंडारा शहरातील गुन्हयांवर नजर ठेवण्यासाठी सर्वत्र सिसिटीव्ही लावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. त्याच प्रमाणे तालुक्याचे शहर व मोठया गावात सिसिटीव्हीचे जाळे निर्माण केले जाईल. पोलीस विभाग हायटेक करण्यासाठी ५०  लाखाचा निधी दिला असून यापुढेही निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या सक्षमीकरणाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केल्या जाईल, असे ते म्हणाले.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@