कृषी राज्यमंत्र्यांच्या गाड्यांवर दगडफेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2018
Total Views |


 

सोलापुरातील घटना, ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांचे कृत्य


सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देऊन ‘रयत क्रांती संघटना’ स्थापन करणारे राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना शनिवारी घडली. सोलापूर दौऱ्यावर असलेल्या खोत यांच्या गाड्यांवर ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’च्या कार्यकर्त्यांनी बार्शी येथे दगडफेक केली तर कुर्डूवाडी येथे जात असताना गाड्यांवर गाजरे फेकण्यात आली. याप्रकारामुळे राज्यमंत्री खोत यांच्या ताफ्यातील एका गाडीचे नुकसान झाले असून पोलिसांनी याप्रकरणी ‘स्वभिमानी’च्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

पळून जाणाऱ्यांनी दुसऱ्याला शिकवू नये
जबाबदारीला घाबरून मांडवातल्या बोहल्यावरून पळून जाणाऱ्यांनी परमार्थाच्या वल्गना करू नयेत. जबाबदारी झटकून पाळणे सोपे असते, मात्र ती पार पडणे अवघड असते. ज्याला संसारच करता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांनी समाजाचा संसार कसा करावा हे सांगू नये. ज्यांनी सहकार मोडीत काढून आंदोलकांचे रक्त सांडले, त्यांच्याशी जवळीक म्हणजे भुताचे पाय उलटे आणि डोळे कपाळावर असतात, ही म्हण खरी असल्याचे द्योतक आहे.
- सदाभाऊ खोत
कृषी व पणन राज्यमंत्री
@@AUTHORINFO_V1@@