मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत नंदुरबारसाठी 1050 कोटी रुपये गुंतवणुकीचे करार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
डॉ.रविंद्र चौधरी यांच्या प्रयत्नांना यश
मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत नंदुरबारसाठी 1050 कोटी रुपये गुंतवणुकीचे करार
नंदुरबार , 24 फेब्राुवारी
मॅग्नेटिक महाराष्ट्र या नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक गुंतवणूक\कदरांच्या परिषदेत नंदुरबार येथे कागद निर्माण प्रकल्प सुरू करण्यासाठी एक हजार 50 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. येथील डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकित त्यांनी याबाबत शब्द दिलेला होता. या निवडणुकित त्यांचा पराभव झाला होता तरी त्यांनी बेरोजगारी दुर करण्यासाठीचे प्रयत्न निरंतन सुरू ठेवले आहेत.
 
 
पालिकेच्या निवडणुकिच्या अगोदरपासून डॉ.रविंद्र चौधरी हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. नंदुरबारची ओळख उद्योग नगरी व्हावी यासाठी त्यांनी पाठपपुरावा सुरू ठेवला.जिल्हयातील बांबु उत्पादन आणि त्या माध्यमातुन आदिवासी बेरोजगारांना मिळणारा रोजगार लक्षात घेवून प्रकाशा येथील 30 कि.मी. अंतरावरील कैलास अग्रवाल या उद्योजकाने जीनस पेपर अॅन्ड बोर्ड लिमिटेड कागद निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा मानस डॉ.रविंद्र चौधरी यांच्याजवळ व्यक्त केला होता. चौधरी यांच्या प्रयत्नांना जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेत यश मिळाले. नंदुरबारच्या कागद निर्मिती प्रकल्पासाठी 729 .77 कोटी रुपयांचे सामंजस्य करार मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने केले. जीनस कागद निर्मिती प्रकल्पाला गती देण्यात यावी यासाठी म्हणून उच्च दर्जाचा अधिकारी देण्यात यावा ही मागणी चौधरी यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी ती तत्काळ मान्य करून आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त करून प्रक्रियेला चालना दिली.
 
 
झालेल्या करारातुन नंदुरबार जिल्हयात 26 प्रकल्प उभे राहणार आहेत. मागासवर्गीय भागासाठी प्राधान्याने उद्योग प्रकल्प देण्याची केंद्र सरकारची जी योजना आहे, त्याचाच भाग म्हणून नंदुरबारमध्ये ही 700 कोटी रुपयांची गंुतवणूक केली जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@