बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
पूर्व विदर्भातील स्वयंसिद्धांनी उत्पादित वस्तू व कलाकृतींच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांची भेट

नागपूर: पूर्व विदर्भातील महिला बचतगटाने तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासोबतच उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला शासन प्राधान्य देत आहे. स्वयंसिद्धांच्या उपक्रमास इतर विभागांनीही प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
 
दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात स्वयंसिद्धा या नागपूर विभागीय प्रदर्शनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांसोबतच संवाद साधला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, भंडाऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार सुर्यवंशी, नागपूरच्या डॉ.कादंबरी बलकवडे, प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर आदी यावेळी उपस्थित होते.
 
 
 
 
स्वयंसिद्धा या महिला बचत गटाच्या माध्यमातून नागपूर विभागातील ३५० महिलांनी एकत्र येऊन विविध उत्पादने व खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. पूर्व विदर्भातील १७१  महिला बचत गटाचे १२६ स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. हे प्रदर्शन भंडारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील अंबाडीचे सरबत हे आकर्षण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला बचत गटाच्या सदस्यांनी तयार केलेल्या सरबताची चव घेतली. तसेच ग्रामीण भागातील औषधीद्रव्य असलेल्या विविध उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
 
 
 
महिलांनी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तयार केलेल्या विविध वस्तू, कलाकृती तसेच ग्रामीण खाद्यपदार्थाचे विभागीय प्रदर्शन शुक्रवार, दिनांक २३  फेब्रुवारीपासून दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून समूहातून स्वयंसिद्धा अंतर्गत महिलांना बाजारपेठ व जनतेला गावाकडचा माल उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@