बाजार समित्यांनी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्यात - सुभाष देशमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018
Total Views |
 
 

 
 

हिंगणघाट बाजार समितीमधील लिलाव शेडचे लोकार्पण
 

वर्धा :  महाराष्ट्र वैभवशाली करण्यासाठी सहकार क्षेत्र सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या सहकार क्षेत्राचे महत्वाचे अंग असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा गाभा आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
 
 
यावेळी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाचा उल्लेख करताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या गरजेचं अत्यंत प्रभावी काम हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणाऱ्या बाजार समितीचे त्यांनी अभिनंदन केले.
 
 
 
शेतक-यांना योग्य बाजारभाव मिळावा म्हणून शेतमालाची खुली लिलाव पद्धती शासनाने सुरू केली. तसेच शेतकऱ्यांना द्यावी लागणारी अडत आता अडत्यानीच देण्यासाठी नवीन शासन निर्णय जारी केला. बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार दिला आहेत. भविष्यात या शेतकाऱ्यांमधूनच नेतृत्व निर्माण होऊन बाजार समितीचे अध्यक्ष पद त्यांना मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी  ५  वर्षात किमान  ३  वेळा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विकावा असे, आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर शेतकऱयांनी शेतमाल लगेच काढल्या - काढल्या विकू नये. तो शेतमाल तारण योजनेत ठेवून तात्पुरती गरज भागवावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@