चंद्रपूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे : रामदेव बाबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जिल्हास्तरीय कृषी मेळाव्यात बाजाराप्रमाणे शेती करण्याचे दिले धडे
 

शेतकऱ्यांनी विविध शेती उत्पादनाचे बाबा रामदेव यांना दाखविले नमुने


चंद्रपूर : ‘ खेत में वही डालो, जो पेठ में डाल सकते हो ’... असे आवाहन करत चंद्रपूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी वनौषधी करतांना सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करावा, असे आवाहन योगगुरु बाबा रामदेव महाराज यांनी केले. जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनीला मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी संबोधीत केले.
 
 
 
चंद्रपूर तालुक्यातील मूल येथे २०,२१  व २२ असे तीन दिवस बाबा रामदेव महाराज यांचे योगाभ्यास शिबीराचे आयोजन राज्याचे नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. मंगळवारी मुल येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. बुधवारी महिला मेळाव्याचे आयोजन चंद्रपूरमध्ये करण्यात आले होते. तर आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हास्तरीय कृषी मेळाव व प्रदर्शनीचे आयोजन केले होते.
 
 
 
या आयोजनाच्या व्यासपीठावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ज्येष्ठ समाज सेवक डॉ.विकास आमटे, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, नगराध्यक्ष ऐतशाम अली, स्वागता अध्यक्ष कृषी सभापती अर्चना नरेंद्र जिवतोडे, माजी मंत्री संजय देवतळे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, सभापती ब्रिजभुषण पाझारे, सभापती गोदावरी केंद्रे, राहूल सराफ, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.
 
 
 
या कार्यक्रमाच्या आयोजनाचे वैशिष्टये म्हणजे, जिल्हयातील शेतकऱ्यांनी कोटयावधीचा व्यवसाय करणारे पतंजलीचे मार्गदर्शक बाबा रामदेव यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना आपल्या शेतातील विविध उत्पादीत वस्तू व त्यापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थाची मार्केटींग थेट त्यांच्यासोबत केली. रामदेव बाबा यांनी देखील शेतकऱ्यांनी दिलेल्या विविध वस्तू स्वत:कडे ठेवून घेत. यातील उत्तम प्रतिच्या उत्पादनांना चांगली बाजार पेठ उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. या ठिकाणी अनेकांनी रामदेव बाबा यांना दाखविण्यासाठी दुधाळू जनावरेही आणली होती. रामदेव बाबा यांनी त्यांची पाहणी केली.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@