बलशाली भारतासाठी योग ही जीवनपध्दत बनवा - स्‍वामी रामदेव बाबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 
 

 
 


बचत गटांच्या चळवळीतून महिला सक्षमीकरणाला प्रारंभ - सुधीर मुनगंटीवार
स्वामी रामदेव यांनी देशाच्या मानसिक स्‍वास्‍थ्‍याला सुदृढ केले - पंकजा मुंडे
चंद्रपूर : सन २०५०  मध्ये सुदृढ दोन पिढयांचा बलाढय भारत बघायचा असेल, तर उत्तम आरोग्यासाठी घराघरात योग ही जीवन पध्दत झाली पाहिजे. आमची संस्कृती, आमचे पूर्वज, आमचे प्राचीन आयुर्वेद आणि योगविद्या आम्हाला जगामध्ये सर्वोच्च स्थान बहाल करेल. त्यामुळे घराघरातील महिलांनी आहार,संसार, विचार व व्यवहार या चर्तुसूत्रीला योगाच्या माध्यमातून अंमलात आणावे, असे आवाहन योगगुरु स्‍वामी रामदेव महाराज यांनी केले.
 
 
चंद्रपूर तालुक्यातील मूल येथे २०,२१  व २२  असे तीन दिवस स्‍वामी रामदेव महाराज यांचे योगाभ्यास शिबीराचे आयोजन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. काल मंगळवारी मुल येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. आज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित केलेल्या या महिला मेळाव्याला मोठया संख्येने मातृशक्ती उपस्थित होती. सतत दोन तास योग विद्येचे प्रशिक्षण आणि नव्या पिढीला संस्कारक्षम बनविण्यासाठी करायच्या संस्काराला यावेळी बाबा रामदेव यांनी विषद केले. आहार,संसार, विचार आणि व्यवहार यामध्ये आपल्या प्राचिन सभ्यतेचा उपयोग करुन सद्याच्या व येणा-या पिढीला सुदृढ, विचारशील, व्यवहारिक आणि सुसंस्कृत बनविण्याचे सर्व सूत्र महिलांच्या हाती आहे.
 
 
 
 
त्यासाठी त्यांनी स्वत: उत्तम आरोग्याचे धनी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी महिलांना रोजच्या जीवनचक्रात सहजपणे करता येणा-या अनेक योगाचे प्रात्यक्षिक दिले. चंद्रपूरातील हजारो महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर वित्‍त व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री ना. पंकजा मुंडे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी आदी उपस्थित होते. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@