धुळे जिल्ह्यात १२ वीची परीक्षा सुरळीत सुरु४४ परीक्षा केंद्रावर २५ हजार ८५५ विद्यार्थी प्रविष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 

धुळे जिल्ह्यात १२ वीची परीक्षा सुरळीत सुरु

४४ परीक्षा केंद्रावर २५ हजार ८५५ विद्यार्थी प्रविष्ट


धुळे, २१ फेब्रुवारी –
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कॉपीमुक्त परीक्षेसाठी अधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली खरी परंतु काही ठिकाणी कॉप्यांचा पाउस पडलाच. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने उर्वरित सर्वच केंद्रावर इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला.
इयत्ता १२ वीची बुधवारपासून बोर्डाची परीक्षा सुरू झालेली असून आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ४४ केंद्रावर २५ हजार ८५५ विद्यार्थी परीक्षा देतील. जिल्हयात बारावीचे पाचसंवेदनशील केंद्र आहेत. धुळे शहरातील सात केंद्रावर ही परीक्षा होत आहे.

यावेळी परीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना प्रश्नांचे अवलोकन करण्यास अवधी मिळाला. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसमक्ष बंद पाकीटातूनप्रश्नपत्रिका उघडण्यात आल्या.
परीक्षा मंडळाच्या नवीन निर्णयाचा धसका 
यावर्षी परीक्षा मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कडक निर्णय घेतला. ११ वाजेनंतर परीक्षा केंद्रातयेणाऱ्या विद्यार्थ्याला पेपरला बसू न देण्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच धसका घेतल्याने जिल्ह्यात एकाही केंद्रावर विद्यार्थी उशिरा आले नाहीत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
कॉपीचे तुरळक प्रकार
जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला होता. ११ वाजेनंतर केंद्राचे मुख्यप्रवेशद्वारच बंद करण्यात आल्याने, कोणालाही आत जाणे शक्य होत नव्हते. यावेळी कडक बंदोबस्तामुळे बाहेरून कॉपी देण्याच्या प्रकारालाही बऱ्यापैकी आळा बसला होता.
 
@@AUTHORINFO_V1@@