अग्नी-२ ची चाचणी यशस्वी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |

 
बालासोर (ओडीसा) : संरक्षण संशोधन आणि विकास प्राधिकरण अर्थात डीआरडीओ ने अग्नी - २ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशा किनारपट्टीवरील अब्दुल कलाम बेट येथे हि चाचणी करण्यात आली आहे. अग्नी २ या अणु क्षेपणास्त्राची माराकारण्याची क्षमता २ हजार किमी एवढी आहे.
 
 
या क्षेपणास्त्राची लांबी २० मीटर एवढी असून, १७ टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे, तसेच १००० किलो पेलोड क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र आहे. अग्नी-२ क्षेपणास्त्र भारतीय लष्करात यापूर्वीच दाखल केले गेले आहे, मात्र यावेळी यात अचूक मारा करण्याची क्षमता, आणि नेव्हिगेशन प्रणाली आधुनिक पद्धतीने विकसित केली गेली आहे.
 
 
हि चाचणी भारतीय लष्कराचे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यांच्या प्रशिक्षण कार्यकाळ अंतर्गत करण्यात आली आहे. लष्करा तर्फे सांगण्यात आले आहे की, सकाळी ८:३० च्या सुमारास ओडीसा येथील बालासोर येथे हि चाचणी सुरु करण्यात आली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@