कोल्हापूरच्या शाहू माने याला नेमबाजीत सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : कोल्हापूरचा नेमबाज शाहू माने याने ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत’ १० मीटर एअर रायफल प्रकारात आज सुवर्ण पदक पटकाविले आहे. तर मुलींच्या १० मीटर एअर रायफलमध्ये पुण्याच्या नंदिता सुळ हिने रजत पदकाची कमाई केली आहे. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दिल्लीत ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धा’ सुरु असून आज महाराष्ट्राच्या नेमबाजांनी सुवर्ण व रजत पदकांवर नाव कोरले. 
 
 
 
नवी दिल्ली येथील डॉ. कर्नीसिंह शुटींग रेंजवर झालेल्या सामन्यात कोल्हापूरच्या सेंट झेवियर्स हायस्कूलचा शाहू माने याने १० मीटर रायफल प्रकारात २४७.७ गुणांची कमाई करत हे सुवर्ण पदक पटकाविले. तसेच या स्पर्धेत तामिळनाडूच्या रितिक रमेशला रजत तर दिल्लीच्या पार्थ माखीजाला कांस्य पदक मिळाले आहे.
 
 
मुलींच्या १० मीटर स्पर्धेत एअर रायफल प्रकारात पुणे येथील बी.आर.घोलप महाविद्यालयाची नंदिता सुळ हिने २४९.३ गुणांसह रजत पदकाची कमाई केली आहे. केवळ २.३ गुण कमी पडल्याने नंदिताच्या हातून सुवर्ण पदक निसटले. चंदीगडच्या झीना खातियाने २५१.६ गुणांसह सुवर्ण तर मध्य प्रदेशच्या याना राठोरने कांस्य पदक पटकाविले आहे. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दिल्लीत ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. देशभरातील १७ वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांनी १६ क्रीडा प्रकारात यात सहभाग घेतला आहे.
@@AUTHORINFO_V1@@