शिंदखेडा रेल्वे स्टेशनला लांब पल्याच्या गाड्या थांबवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2018
Total Views |
 

शिंदखेडा रेल्वे स्टेशनबाबत मुख्यव्यवस्थापक गुप्ता यांना निवेदन
शिंदखेडा - पश्चिम रेल्वेच्या शिंदखेडा रेल्वे स्टेशनला लांब पल्याच्या गाड्या थांबवाव्यात या मागणीसाठीचे निवेदन ए. के. गुप्ता यांना नंदुरबार येथे देण्यात आले.
 

पश्चिम रेल्वेच्या शिंदखेडा रेल्वे स्टेशनला लांब पल्याच्या गाड्या थांबवाव्यात या मागणीसाठीचे निवेदन ए. के. गुप्ता यांना नंदुरबार येथे देण्यात आले
 

प्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष सलीम नोमानी रवींद्र लखोटे खुशाळभाई ओसवाल प्रेमराज मराठे सदाशिव देसले प्रा प्रदीप दीक्षित प्रा चंद्रकांत डागा यासह भाजपचे शहर अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी दादा मराठे राजेंद्र मोरे बाळासाहेब गिरासे इत्यादींचा सहभाग होता.
 
संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक वेळेला नवजीवन एक्स्प्रेस सह इतर गाड्यानं थांबा मिळावा या मागणीसाठी पाठपुरावा केला गेला मात्र आश्वस्नाव्यतिरिक्त काहीही हाती लागले नाही माजी खासदार बापू चौरे माजी केंद्रीय मांत्रि माणिकराव गावित यांच्या माध्यमातून पण प्रयत्न झाले होते मात्र त्याचाही उपयोग झाला नव्हता सध्याचे विद्यमान केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री ना .डॉ. सुभाष भामरे यांचेही या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. निश्चित नवजीवनला थांबा मिळेल असे आश्वासन मिळूनही अद्यापपावेतो रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सारे गाव सर्व पक्ष पदाधिकारी युवा संघटना युवक एकत्रित येत असून मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे प्राशासनची झोपच उडवण्याचा संकल्प केला आहे. अर्थात नंदुरबार येथे आलेले रेल्वे मुख्य व्यवस्थापक ए के गुप्ता यांना लेखी निवेदन दिले असून नवजीवन एक्स्प्रेस ,प्रेरणा एक्स्प्रेस यांना थांबा देण्यात यावा अन्यथा पुढील आठवड्यात रेल रोको आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामास रेल प्रशासन जबाबदार राहील असे लेखी कळवण्यात आले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@