क्रीडा स्पर्धेत नंदुरबार जलसंपदा विभागाचे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |
 
 
द्वितीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत
नंदुरबार जलसंपदा विभागाचे यश
नंदुरबार-
जलसंपदा विभागातर्फे सातारा येथे झालेल्या द्वितीय राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत येथील जलसंपदा विभागाचे विजय जाधव व नरेंद्र गिरासे यांनी कांस्य पदक पटकाविले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जलसंपदा विभागाच्यावतीने ९ ते १२ फेब्रुवारी २०१८ दरम्यान द्वितीय राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव संघामार्फत नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे विजय रोहिदास जाधव यांनी ३ हजार मीटर व १० हजार मीटर धावणे स्पर्धेत तर नरेंद्र बापू गिरासे यांनी जलतरण (१०० मीटर) स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. विजय जाधव हे शाखा अभियंता पदावर कार्यरत असून नरेंद्र गिरासे हे स्वतः माजी सैनिक आहेत. विजयी खेळाडूंना अधिक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, उपकार्यकारी अभियंता एस.ए.भालेराव, उपविभागीय अभियंता एन.पी.विसपुते यांचे मार्गदर्शन लाभले. नरेंद्र गिरासे व विजय जाधव यांना जलसंपदा विभागाचे सचिव सी.ए.बिराजदार यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पदक देवून गौरविण्यात आले. 
@@AUTHORINFO_V1@@