त्रिपुरा विधानसभेसाठी भाजपाचा ‘हिरा आणि माकपाच्या ‘माणिकमध्ये लढत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
ईशान्य भारतातील त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा ‘हिरा’ आणि माकपचे ‘माणिक’ यांच्यात यावेळी ‘सरकारङ्क स्थापन करण्यासाठी चुरशीचा मुकाबला होत आहे. ईशान्य भारतातील आठपैकी पाच राज्यांत सध्या भाजपाच्या नेतृत्वातील ‘नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स’ म्हणजे ‘नेडा’ची सरकारे आहेत. यातील आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार आहे; तर सिक्कीम आणि नागालॅण्डमध्ये भाजपाच्या मित्रपक्षांचे.
केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन करणाऱ्या भाजपाने ईशान्य भारतातील राज्यांच्या सामूहिक हिताचे रक्षण करण्यासाठी तसेच काँग्रेसेतर पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी २०१६ मध्ये ‘नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स’ची (नेडा) स्थापना केली होती. काँग्रेसमधून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आलेले आणि सध्या आसामचे अर्थमंत्री असलेले हेमंत बिस्व शर्मा नेडाचे संयोजक आहेत.
 
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी)शी युती केली आहे. राज्यात भाजपा ५१, तर आयपीएफटी नऊ जागांवर लढत आहे. डाव्या आघाडीने सर्व म्हणजे ६० जागांवरही आपले उमेदवार उतरवले आहेत. माकपाच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीत भाकप, आरसीपीआय आणि फॉरवर्ड ब्लॉकचा समावेश आहे. काँग्रेस ५६ तर तृणमूल काँग्रेस २४ जागांवर लढत आहे.
 
आतापर्यंत मित्रपक्ष असलेल्या इंडिजिनस नॅशनलिस्ट पार्टी ऑफ त्रिपुराशी (आयएनपीटी) भाजपाशी युती होऊ शकली नाही. आयएनपीटीने भाजपाकडे सहा जागांची मागणी केली होती, पण भाजपाने ती फेटाळून लावली. आयपीएफटीने भाजपाशी युती केली असली तरी तो नेडात नाही. आयपीएफटी आणि आयएनपीटी यांची वेगळ्या राज्याची मागणी आहे, मात्र भाजपाचा वेगळ््या राज्याच्या मागणीला विरोध आहे. मात्र, तरीसुद्धा भाजपा आणि आयपीएफटी यांची युती झाली आहे.
 
देशातील सर्वांत गरीब मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेले माणिक सरकार हे २५ वर्षांपासून त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत. मुख्यमंत्री असूनही माणिक सरकार यांचे स्वत:चे घर नाही, गाडी नाही, अतिशय साध्या राहणीसाठी ते ओळखले जातात. मुख्यमंत्री म्हणून मिळणारा पगार आणि अन्य भत्ते ते पक्षाकडे जमा करतात आणि पक्ष त्यांना महिना पाच हजार रुपये मानधन देतो, त्यातून त्यांचा महिनाभराचा खर्च चालतो, अशा बातम्या आल्या. या जर खèया असतील, तर त्याचे निश्चितच कौतुक करायला पाहिजे.
 
मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी स्वत:ला ठरवून गरीब केले, मात्र राज्यातील जनतेलाही त्यांनी जाणीवपूर्वक गरीबच ठेवले. २० वर्षांपासून माणिक सरकार स्वत: मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील गरिबांचे कल्याण करायला हवे होते. पण राज्यातील गरीब गरीबच राहिला, त्याच्यापर्यंत विकासाची किरणे पोहोचलीच नाहीत. गरिबांच्या उत्थानासाठी कोणतीही पावले २० वर्षांत नावातच ‘सरकार’ असलेल्या माणिक यांनी उचलली नाहीत. कम्युनिस्ट राजवटीच्या २५ वर्षांनंतरही गरीब गरीबच राहात असेल, तर अशा राजवटीचा उपयोग काय, ती हटवलीच पाहिजे, असे राज्यातील जनतेचे मत झाले आहे. त्यामुळेच ‘चलो पलटाय’ म्हणजे सत्तापरिवर्तन करा, असा आवाज राज्यात यावेळी घुमू लागला आहे.
 
जोपर्र्यंत त्रिपुराचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास झाला, असे म्हणता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केले. त्रिपुराच्या विकासासाठी येणाऱ्या पैशापैकी ८० टक्के पैसा केंद्राकडून येतो, पण तरीही गेल्या २५ वर्षांत त्रिपुराचा विकास का झाला नाही, याचे उत्तर माणिक सरकार यांनी दिले पाहिजे. त्यामुळेच राज्यातील जनतेने आपल्या गळ्यात चुकीचे ‘माणिकङ्क घातले आहे, राज्यातील जनतेला खऱ्या अर्थाने ‘हिऱ्या’ची गरज आहे, त्यामुळे राज्यातील जनतेने असे बिनकामाचे ‘माणिक’ आपल्या गळ्यातून काढून फेकले पाहिजे आणि विकासाच्या वाटेवर नेणारा ‘हिरा’ आपल्या गळ्यात घातला पाहिजे, असा मोदी यांच्या म्हणण्याचा मथितार्थ आहे.
 
मोदी यांना हिरा म्हणजे ‘एच’ म्हणजे हायवे, ‘आय’ म्हणजे इंटरनेट, ‘आर’ म्हणजे रोड-वे आणि ‘ए’ म्हणजे एअर-वे अपेक्षित आहे. म्हणजे जोपर्यंत त्रिपुरात महामार्ग बनत नाही, रेल्वेजाळे वाढत नाही, विमानतळ होत नाही आणि टेलिफोन येत नाही, तोपर्यंत त्रिपुराचा विकास होणार नाही, असे मोदी यांना म्हणायचे आहे. त्याचप्रमाणे चार ‘टी’च्या साह्याने त्रिपुराचा चेहरामोहरा बदलण्याचा पंतप्रधान मोदी यांचा निर्धार आहे. पहिला टी म्हणजे चहा, तर ट्रेन, टूरिझम आणि ट्रेनग या अन्य तीन टीच्या मदतीने त्रिपुराला विकासाच्या वाटेवर आणण्याचा संकल्प मोदी यांनी सोडला आहे.
 
२०१३ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फक्त दीड टक्का मते मिळाली होती, एकही जागा पक्षाला जिंकता आली नव्हती. त्या पाश्र्वभूमीवर भाजपाचा राज्यातील प्रवास सर्वांनाच सुखावणारा आहे. भाजपा सत्तेची दावेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. याचे सर्व श्रेय जाते, ते त्रिपुरा भाजपाचे प्रभारी सुनील देवधर यांनी गेल्या तीन वर्षांत केलेल्या मेहनतीला! त्रिपुरासोबत मेघालय आणि नागालॅण्डमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे, पण भाजपाला सर्वाधिक आशा आहे, ती त्रिपुराकडून!
 
याउलट, राज्यातील काँग्रेसची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. गत विधानसभा निवडणुकीत दहा जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आपले आमदाराही सांभाळता आले नाहीत. राज्यातील काँग्रेसच्या दहापैकी सात आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसने उमेदवारी दिल्यावरही एका आमदाराने भाजपात प्रवेश करून राज्यात काँग्रेसची स्थिती काय आहे, ते दाखवून दिले आहे.
 
२०१३ मध्ये माकपाने राज्यात ४९ जागा qजकल्या होत्या. भाकपाला एक जागा मिळाली होती. गेल्या चार निवडणुकांत माकपाने qजकलेल्या या सर्वाधिक जागा होत्या. विशेष म्हणजे माकपाने जिंकलेल्या जागा आणि त्यांची मतांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. काँग्रेसने ३६.५ टक्के मतांसह १० जागा जिंकल्या होत्या. २००८ मध्ये माकपाने ४८ टक्के मतांसह ४६ जागा जिंकल्या होत्या.
 
१९९८ मध्ये माकपाने ४५.५ टक्के मतांसह ३८ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ३४ टक्के मतांसह १३ जागा पटकावल्या. १९९८ मध्ये राज्यात भाजपाला सर्वाधिक म्हणजे ५.९ टक्के मते मिळाली, पण भाजपा एकही जागा जिंकू शकली नाही. २००३ मध्ये माकपाच्या मतांच्या टक्केवारीत किंचित वाढ होत ती ४६.८ टक्के झाली, मात्र माकपच्या ३८ जागा कायम राहिल्या. काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत किंचित घट झाली, मात्र त्यांच्याही १३ जागा कायम राहिल्या. भाजपाच्या मतांमध्ये मात्र मोठी घट झाली, ५.९ टक्क्यांवरून भाजपा १.३ टक्क्यांवर आली.
 
१९९८ ते २०१३ पर्यंत झालेल्या सलग चार विधानसभा निवडणुकांत भाजपाला राज्यात आपले खातेही उघडता आले नव्हते. त्यामुळे यावेळी भाजपाने केलेली प्रगती लक्षणीय आहे. भाजपा राज्यात यावेळी खातेच उघडणार नाही, तर सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आली आहे.
 
त्रिपुरात यावेळी भाजपाची सत्ता आली तर कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण त्रिपुरात कमळ फुलवण्याची पूर्वतयारी सुनील देवधर यांनी त्रिपुरा भाजपाचे अध्यक्ष विप्लबकुमार देब यांच्या मदतीने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह , अरुण जेटली, नितीन गडकरी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रचाराने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. माकपाला आपल्या ताब्यातील शेवटचे राज्यही यावेळी गमवावे लागणार आहे, कारण त्रिपुरातील जनतेने ‘चलो पलटाय’चा निर्धारच केला आहे!
 
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७
@@AUTHORINFO_V1@@