रेती खरेदी करणाऱ्या नागरिकांनी रेती वाहतूकीच्या पासेस गरजेचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 

यंत्रणेकडून घाटातील रेती निर्गतीकरीता वाहतूक पासेस प्रदान
 
रेती खरेदी करताना बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी परिमाणानुसार पासेस घ्याव्या
 
बांधकामावर रेतीचा साठा असल्यास महसूल कर्मचाऱ्यांकडून तपासणी
 

 
बुलडाणा:  अवैध रेती वाहतूकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. विविध उपाय योजनांमधून या प्रकारावर नियंत्रण मिळविण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. आता यापुढे बांधकामाकरीता किंवा इतर कामाकरीता रेतीची आवश्यकता असल्यास रेतीची खरेदी करताना संबधित वाहन धारकांकडे परिमाणानुसार (ब्रासनुसार) नागरिकांनी वाहतूक पासेसची मागणी करावी.
 
 
 
अशा वाहतूक पासेसची प्रत स्वत:जवळ जपून ठेवाव्यात. नागरिकांनी आपल्या बांधकाम स्थळावर रेतीची साठवणूक केली असल्यास त्या रेतीची अथवा वाळूची तपासणी करण्याकरीता महसूल विभागातील तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी जाणार आहेत. अशी तपासणी होत असताना सदर महसूल यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांना संबंधित रेती खरेदीदार नागरिकाने केलेल्या रेती साठ्यानुसार वाहतुक पासेस तपासणीकरीता उपलब्ध करून द्याव्यात. जर बांधकाम स्थळी साठवणूक केलेल्या रेतीच्या अथवा वाळूच्या साठ्या इतक्याच वैध वाहतूक पासेस आढळून न आल्यास संबधित रेती खरेदीदारावर नियमानुसार योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@