फळे, भाजीपाला निर्यातीसाठी 'अनारनेट' प्रणालीवरील नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 

युएसए, चीन, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, द. कोरिया, जपान, मलेशिया व मॉरीशस देशांची प्रमाणपत्राची मागणी

मॅगोनेट/अनारनेट प्रणालीवर नोंदणी/नुतनीकरण २८ फेब्रुवारीपर्यंत करावी
 
बुलडाणा : महाराष्ट्र राज्य हे ताजी फळे व भाजीपाला निर्यातीमध्ये देशामध्ये आघाडीवर आहे. राज्यातून अनेक देशांमध्ये फळे व भाजीपाला निर्यात होत असतो. निर्यातक्षम फळांसाठी अनारनेट, मॅगोनेट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सन २०१७-१८  मध्ये युएसए, चीन, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, द. कोरिया, जपान, मलेशिया व मॉरिशस या देशांनीही मॅगोनेट व अनारनेट अंतर्गत निर्यातक्षम बागांच्या नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्याचा समावेश मॅगोनेट अंतर्गत करण्यात आला आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून फळबागांची तपासणी करण्यात येणार असून सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आंबा व डाळींब फळपिकाची लागवड आहे. मॅगोनेट / अनारनेट प्रणालीवर नोंदणी/नुतनीकरण करावयाचा कालावधी २८  फेब्रुवारी २०१८ पर्यंत असून इच्छूक शेतकऱ्यांनी संबधित तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क रावा.
 
 
युरोपियन युनियनला व इतर देशांना निर्यातीकरीता प्रामुख्याने किडनाशक उर्वरित अंश व किड, रोग मुक्त उत्पादनांची हमी देणे आवश्यक आहे. त्यामुळे अपेडा व कृषि विभागाच्या समन्वयाने राज्यात रेसिड्यु मॉनिटरींग प्लॅनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये निर्यातक्षम बागांची नोंदणी, त्याची तपासणी तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आदी कामे कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपरोक्त प्रणालीवर शेतकऱ्यांनी नोंदणी करून संबधित तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@