५७५ आदिवासी दांपत्यांचा सामूहिक विवाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |

शासनाचा कन्यादान योजनेतून ५७५ दांपत्यांचा सामूहिक विवाह
खा. डॉ .हिना गावित व आ. विजयकुमार गावित यांची उपस्थित

 
 
नंदुरबार : तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तळोदा, धडगांव ,शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील अनुसूचित जमातींच्या लाभार्थींची शासनाचा कन्यादान योजनेतून ५७५ दांपत्यांचा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला. सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानी खा. डॉ. हिना गावित होत्या तर प्रमुख मान्यवर आ .डॉ.विजयकुमार गावित उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्पअधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
 
 
याप्रसंगी खासदार हिना गावित यांनी शासनाच्या या कन्यादान योजनामुळे सामान्य कुटूंबातील लग्नात होणाऱ्या अनाठायी खर्चात बचत होते अनुचित प्रथांना आळा घालण्यास मदत होण्यास मदत होते असे मार्गदर्शन केले.आ डॉ विजयकुमार गावित यांनी नवंदांपत्यांस आशीर्वाद देत आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .
 
 
सामूहिक विवाह सोहळा यशस्वी करणेसाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारींनी परिश्रम घेतले
 
@@AUTHORINFO_V1@@