उथळपेठ येथील इको पार्कचे आज लोकार्पण संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2018
Total Views |
 

 
 
 
 
चंद्रपूर : निसर्गाने ज्‍या परिसराला भरभरून दिले आहे त्‍याचे सौंदर्य अधिक वाढवत ते स्‍थळ पर्यटकांच्‍या आकर्षणाचे केंद्र बनावे यासाठी नवनवीन संकल्‍पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहे. इको पार्क ही त्‍यातील एक प्रमुख संकल्‍पना आहे. पर्यावरण संवर्धन, निसर्ग संवर्धनासाठी ते सतत प्रयत्‍नशील आहे. त्‍यांच्‍या विविध लोकहितकारी निर्णयामुळे एरव्‍ही दुर्लक्षित समजला जाणारा वनविभाग आता मुख्‍य प्रवाहात आला असुन लोकांच्‍या हृदयात विशेष स्‍थान वनविभागाने निर्माण केले आहे, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.
 
चंद्रपूर जिल्‍हयातील मुल तालुक्‍यातील उथळपेठ येथील  गायमुख देवस्‍थान या निसर्ग पर्यटन क्षेत्राच्‍या ठिकाणी तयार करण्‍यात आलेल्‍या इको पार्कच्‍या लोकार्पण सोहळयात चंदनसिंह चंदेल बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, चंद्रपूरात बायपास मार्गावर वनविकास महामंडळाच्‍या माध्‍यमातुन भारतरत्‍न डॉ. एपीजे अब्‍दुल कलाम निसर्ग उद्यान  सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने जनतेच्‍या सेवेत रूजु झाले असुन पर्यटकांच्‍या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
 
 
 
मुल शहरात पंडीत दीनदयाल उपाध्‍याय इको पार्क, पोंभुर्णा शहरात भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क तयार करण्‍यात आले आहे. ब्रम्‍हपूरी येथे सुध्‍दा त्‍यांच्‍या पुढाकाराने इको पार्क च्‍या निर्मीतीला मंजूरी मिळाली आहे. या माध्‍यमातुन निसर्ग पर्यटनाला त्‍यांनी चालना दिली आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेच्‍या माध्‍यमातुन उथळपेठ गायमुख देवस्‍थान परिसरात तयार करण्‍यात आलेल्‍या इको पार्क मुळे या परिसराचया वैभवात आणखी भर घातली जाणार असल्‍याचे चंदनसिंह चंदेल यावेळी बोलताना म्‍हणाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@