निरामय आरोग्‍यसाठी योग लोकांपर्यंत पोहचणे आवश्‍यक - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2018
Total Views |
 

 
 
 
चंद्रपूर: योगऋषी स्‍वामी रामदेवजी महाराज यांच्‍या योग शिबीराच्‍या तसेच शेतकरी मेळावा व महिला सम्‍मेलनाच्‍या माध्‍यमातुन आर्थीक स्‍वातंत्र्याची चळवळ कर्मवीर मा. सा. कन्‍नमवारांच्‍या मुल नगरीतुन सुरू होत आहे. हे आयोजन केवळ एक आयोजन किंवा कार्यक्रम नसुन त्‍या माध्‍यमातुन निरामय आरोग्‍य, महिला सक्षमीकरण आणि शेतक-यांच्‍या जीवनात प्रगतीचा व उन्‍नतीचा प्रकाश निर्माण करण्‍याचा आपला प्रयत्‍न असल्‍याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तीन दिवस चालणारे हे योग शिबीर, शेतकरी मेळावा व महिला महासम्‍मेलन यशस्‍वी करण्‍यासाठी कार्यकर्त्‍यांनी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करावी, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
 
 
डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर आणि पतंजली योग समिती चंद्रपूर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने योगऋषी स्‍वामी रामदेवजी महाराज यांच्‍या विशेष उपस्थितीत मुल शहरात दिनांक २० , २१ आणि २२ फेब्रुवारी दरम्‍यान निःशुल्‍क योगचिकीत्‍सा व ध्‍यान शिबीर तसेच २० फेब्रुवारी रोजी मुल शहरात योग दीक्षा समारंभ व विशाल शेतकरी मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे.
 
 
त्‍याचप्रमाणे चांदा क्‍लब ग्राऊंड चंद्रपूर येथे २१ फेब्रुवारी २०१८ रोजी महिला महासम्‍मेलनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या आयोजनांचा आढावा घेण्‍याच्‍या दृष्‍टीने कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार सभागृह मुल येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला संबोधताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
 
 
निरामय आरोग्‍यसाठी योग लोकांपर्यंत पोहचणे आवश्‍यक आहे. अमेरिकेत, जर्मनीत विशाल स्‍वरूपाची योगकेंद्रे उभी राहिली आहेत मात्र याचा मुळ आधार भारतीय आहे. हे आयोजन यशस्वी करण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य, सरपंच, नगर परिषद सदस्‍य, मनपा सदस्‍य या सर्व लोकप्रतिनिधींनी लोकांपर्यंत पोहचुन त्‍यांच्‍याशी संवाद साधण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. 
 
@@AUTHORINFO_V1@@