भारतात पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार वाईन बाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



नाशिक (जयदीप दाभोळकर) :
सन बाथ किंवा बाथचे इतर काही प्रकार आपण अनुभवले असतील किंवा आपल्या परिचयाचेदेखील असतील. मात्र, नाशिकमध्ये आयोजित इंडिया ग्रेप हार्वेस्ट, वाईन फेस्टीव्हल २०१८ दरम्यान या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना वाईन बाथचा अनुभव घेता येणार आहे. तसेच यावेळी पर्यटकांना वाईन पेंटिंग व पोर्ट्रेट्स, विनो थेरेपी, वाईनसह कुकिंग, लोकसंगीत, लोकनृत्य, लेझर आणि फॅशन शोसारख्या कार्यक्रमांचादेखील आस्वाद घेता येणार आहे. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा अनोखा अनुभव पर्यटकांना अनुभवायची संधी महाराष्ट्र पर्यटन विभाग घेऊन आला आहे.

शुक्रवारी नाशिकमधील सह्याद्री फार्म्समध्ये इंडिया ग्रेप हार्वेस्ट, वाईन फेस्टीव्हल २०१८ या फेस्टीव्हलचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नाशिक व्हॅली वाईन क्लस्टरच्या सहकार्याने ११ मार्चपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी वायनरी, विनयार्ड आणि कृषी पर्यटन स्थळांवर हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. वाईन बद्दल सामान्यांचा दृष्टीकोन बदलणे, पर्यटनाला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दर दोन वर्षांमधून एकदा हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. फ्रान्स, इटली आणि स्पेन तसेच नापा व्हॅलीसारख्या ठिकाणी आयोजित होणाऱ्या महोत्सवाच्या धर्तीवर हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एकूण २० ठिकाणी हा महोत्सव भरवण्यात येणार आहे.

दरम्यान, या महोत्सवात विंचर वाईन पार्क, व्हॅलोन विनयार्ड, झाम्पा ग्रोव्हर, सोना वायनरी, निफा वायनरी, सुला विनयार्ड, सह्याद्री ॲग्रो फार्म, केनसिंग्टन क्लब, शांदोन इंडियासारख्या वायनरी सहभागी होणार आहेत. राज्यातील आणि प्रामुख्याने नाशिकमधील बागायतदार, मनुका उत्पादक आणि वाईन उत्पादकांना या निमित्ताने एक मंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या कार्यशाळा, आणि चर्चासत्रेदेखील आयोजित करण्यात आली आहेत.

@@AUTHORINFO_V1@@