वाघ बघायला येणाऱ्या पर्यटकांसाठी नवे आकर्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
आगरझरीत उभे राहणार बटरफ्लाय वर्ल्ड
 
 
सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज उदघाटन
 

चंद्रपूर : ४२ टक्के वनाच्छादित प्रदेश, ८० वाघ, २५० ते ३०० विविध पक्षांच्या प्रजातीची उपलब्धता, भव्य प्राचिन वारसा, डौलाने उभे असणारे गडकिल्ले यामुळे जगभराचे लक्ष वेधणाऱ्या चंद्रपूरच्या शिरपेचात नव्या ‘बटरफ्लाय वर्ल्डची’ भर पडणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन ताडोबा नजीकच्या आगरझरीत फुलपाखरांचे पार्क साकारत आहे. आज सुधीर मुनगंटीवार हे या ‘बटरफ्लाय वर्ल्ड’चे लोकार्पण करणार आहेत.
 
या फुलपाखरु पार्कमध्ये फुलपाखरांबद्दलच्या अनेक प्रजाती बघायला मिळणार असून या संदर्भातील अद्ययावत शास्त्रीय माहितीचा खजीना उपलब्ध करण्यात आला आहे. काचेच्या घरांमध्ये फुलपाखरांचा मुक्त विहार लहान मुलांना खेळण्यासाठी विपूल जागा, विविध कारंजी व लटकतेपुल अशा अनेक पर्यटनाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
 
 
 
सर्वात महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प स्थानिक गावक-यांकडून चालविल्या जाणार आहे. नागरिकांनी या नव्या प्रकल्पाला भेट दयावी. लोकार्पण सोहळयाला उपस्थित राहावे, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@