वन वणवा केंद्र आशिया खंडातील सर्वोत्‍तम केंद्र ठरेल - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
चंद्रपूर वन अकादमीत वन वणवा व नैसर्गीक आपत्‍ती निवारण केंद्राच्‍या निर्मीतीसाठी ७ कोटी २३ लक्ष रू. निधी मंजूर
 
 

चंद्रपुर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर येथील वन प्रबोधिनी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गीक आपत्‍ती निवारण केंद्रासह स्‍वतंत्र इमारत, मुलभूत संरचनेसह बांधकाम करण्‍याबाबतच्‍या ७ कोटी २३ लक्ष २७ हजार रू. एवढया किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे.
 
 
केंद्र शासनाच्‍या आपत्‍ती निवारण विषयक योजनेची महाराष्‍ट्रात देखील अंमलबजावणी करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. त्‍या अनुषंगाने चंद्रपूर वन प्रबोधिनी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गीक आपत्‍ती निवारण केंद्रासह स्‍वतंत्र इमारत, मुलभूत संरचनेसह बांधकाम करण्‍याचे निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्‍याअनुषंगाने प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (संशोधन व प्रशिक्षण) यांनी शासनाला प्रस्‍ताव सादर केला होता. या प्रस्‍तावाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे.
 
 
चंद्रपूर वन अकादमीमध्‍ये वन वणवा व नैसर्गीक आपत्‍ती निवारण केंद्र निर्माण करण्‍याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्‍लीच्‍या राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे कार्यकारी संचालक अनिल गुप्‍ता यांच्‍यासह आपत्‍ती व्‍यवस्‍थापन केंद्र यशदा, अग्‍नी सुरक्षा प्रशिक्षण महाविद्यालय नागपूर आदींसह बैठक घेवून या केंद्राचे स्‍वरूप निश्‍चीत करण्‍याच्‍या दृष्‍टीने उच्‍चस्‍तरीय बैठक्‍ घेतली होती. या केंद्रात नियमित प्रशिक्षण, पुर, वन वणवे, मानव-वन्‍यजीव संघर्ष टाळण्‍यासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्रशिक्षण दिले जावे. एखादा बिबट विहीरीत पडला किंवा गावातील एखादया घरात घुसला तर त्‍याची सुटका कशी करायची, या परिस्‍थीतीत लोकांनी नेमके कसे वागायचे याचा देखील त्‍यात समावेश असावा. वातावरणीय बदलामुळे वनातील काही वृक्ष प्रजाती, वन्‍यजीव प्रजाती नाहीशा होत आहेत का, होत असतील तर त्‍याचे रक्षण कसे करायचे याचा देखील या आपत्‍ती निवारण केंद्रात अभ्‍यास करता यावा यादृष्‍टीने या केंद्राची निर्मीती करण्‍यात यावी, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली होती.
@@AUTHORINFO_V1@@