विजेच्या धक्क्याने ताडोबामधील वाघाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |



चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. मृत्यू झालेला वाघ हा तारा नावाच्या वाघिणीचा ३ वर्षांचा बछडा होता. चंद्रपूर जिल्ह्यातील भामडेळी गावामध्ये विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहरली फाटकाजवळ भामडेळी हे गाव आहे.

 

ताडोबा बफर झोनमधील भामडेळी येथील एका शेतात वीजप्रवाह सोडलेला होता. पिकांचे वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी हा वीजप्रवाह सोडला जातो. गावामधील दोन इसमांना त्यांच्या शेतामध्ये वाघ तारांमध्ये अडकल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ताडोबा प्रशासन, वनविभागाचे अधिकारी आणि वन्यजीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या वाघाला तारेपासून वेगळे करण्यात आले. तसेच वन्यजीव चिकित्सकांच्या उपस्थितीमध्ये वाघाचे शवनिच्छेदन करण्यात आले.

 

शेतात लावले जाणारे विद्युत प्रवाहाचे तारेचे कुंपण किती धोकादायक ठरू शकते हे पुन्हा अधोरेखित झाले. संबंधित शेतमालकाविरोधात वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुन्हा वाघाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापूर्वीही येथे वाहनांच्या धडकेने आणि शॉक लागल्याने वाघांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, अवनी या नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूचा वाद सुरू असतानाच ताडोबा बफर झोनमधील पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@