नंदुरबारला 2 कोटींच्या कामांना मंजुरी; विकासाला येईल गती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

न.पा.तील भ्रष्ट कारभाराला आ. शिरीष चौधरींचा दणका; ‘सा.बां.’कडे कामाची जबाबदारी

 
नंदुरबार  :
 
शहराच्या विविध प्रभागातील सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना आमदार शिरीष चौधरी आणि भाजपाचे डॉ. रवींद्र चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाली आहे.
 
तथापी, या विकासकामांना मंजुरी देताना शासनाच्या नगरविकास विभागाने कार्यालय एजन्सी म्हणून नगरपरिषद न ठेवता सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व काम सोपवले असून नंदुरबार नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.
 
 
नंदुरबार नगरपरिषदेतील सत्ताधारी विकास कामे करताना एकच काम दोन वेळा झाल्याचे दाखवून एकाच कामावर दोन वेळा शासकीय निधी खोट्या बिलाच्या माध्यमातून काढून भ्रष्टाचार करीत असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे डॉ. रवींद्र बापू चौधरी आणि अन्य नगरसेवक नेहमी करीत आले आहेत.
 
नंदुरबार नगरपरिषदेत या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार देखील जिल्हाधिकार्‍यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत देण्यात आली होती. या दोनशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची समितीमार्फत चौकशी झाली असून शासनाला अहवाल सादर होणार आहे.
 
दरम्यान, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि नगरविकास विभागाने देखील गांभीर्याने दखल घेतली. परिणामी, नगरपरिषदेला विशेष योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांच्या कामांची मंजुरी देताना नगरविकास विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच ही कामे होतील, असे नमूद केले आहे.
 
 
यामुळे नगरपरिषदेतील सत्ताधारी व ठेकेदारीच्या साखळीला दणका बसला आहे. तसेच जनतेची कामे दर्जेदारच व्हावीत म्हणून डॉ.रवींद्र चौधरी व आ.शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
 
 
आ. शिरीष चौधरी यांनी खास प्रयत्न केल्यामुळे 3 ऑक्टोबर 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार न.पा.ला 2018-19 या वर्षाकरिता विशेष योजनेअंतर्गत दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे..
 
या निधीतून शहरातील प्रभाग क्रमांक 1, 9, 11, 14, 16, 17, 18 यासह विविध दुर्लक्षित भागातील रस्ते, गटारी व सुशोभिकरणाची कामे आ.चौधरी यांनी सुचविली होती. त्यास शासनाने मान्यता दिली असून प्रभागनिहाय त्या कामांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
 
 
प्रभाग क्रमांक 1 - सरोजनगर मधील सार्वजनिक शौचालय बांधकाम 10 लक्ष रूपये, प्रभाग क्रमांक 9 नंदनगरी हाउसिंग सोसायटीतील ओपन स्पेस सुशोभिकरणअंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे, बाक बसवणे, गेट बनवणे यासाठी 10 लक्ष रुपये, गणेश कॉलनीतील ओपन स्पेसला तार कंपाउंड व गेट बसवणे.
 
प्रभाग क्रमांक 11 मधील अहिल्याबाई विहीर सुशोभिकरण करणे, यासाठी 13 लक्ष रुपये,
 
प्रभाग क्रमांक 11 - गणपती मंदिराजवळील स्वच्छतागृह बांधणे, फडके चौकातील पोलीस चौकी बांधणे आणि विमल एम्पोरियम मागे पेव्हर ब्लॉक बसवणे यासाठी 17 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 14 लहान माळीवाडा भिलाटी येथे 50 बाय 35 आकाराचे सभागृह बांधणे यासाठी 25 लक्ष रुपये, बाफना बिल्डिंग परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, केसरी चौकीजवळ पेव्हर ब्लॉक बसवणे,
 
प्रभाग क्रमांक 16 मध्ये संजय टी स्टॉलपासून शिवाजी रोड पर्यंत व तेथून यमुना कलशपर्यंत थ्रीमिक्स पद्धतीने रस्ता तयार करणे.
 
प्रभाग क्रमांक 17 तलावपाडा भिलाटीत समाज मंदिर बांधणे 10 लक्ष रुपये, नवापूर चौफुली गोसावीवाडा येथे सभामंडप बनवणे, मंदिराभोवती पेव्हर ब्लॉक बसवणे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बसवणे यासाठी 10 लक्ष रूपये,
 
प्रभाग क्रमांक 18 नवनाथ नगर पुरुष सार्वजनिक शौचालयापासून तलावापर्यंत सांडपाण्यासाठी मुख्य गटार बांधकाम करणे तसेच गवळीवाडा येथील माता मंदिर सुशोभिकरण करणे यासाठी 15 लक्ष रुपये इत्यादी कामांचा यात समावेश आहे.
 
 
 
 कामांच आदेश शासनाकडून प्राप्त
 
अमळनेर विधानसभा मतदारसंघात आणि नंदुरबार शहरात विविध जनताभिमुख कामे उभारून कार्यसम्राट असा लौकिक मिळविलेले आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी व भाजपाचे युवानेते डाँ.रविंद्रबापू चौधरी यांनी विशेष प्रयत्न करून नंदुरबार शहरातील प्रभागांमधील तब्बल दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडे कडून मान्यता मिळविली आहे. जिल्हाधिकारी यांना या कामांविषयीचे आदेश शासनाकडून नुकतेच प्राप्त झाले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@