सावधान; ब्लू व्हेलचे जाळे पसरतेय!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |



ब्लू व्हेलच्या नादात नागपुरात एका १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

 

नागपूर : ब्लू व्हेल या धोकादायक गेमचे नाव सर्वांनीच ऐकलं असेल. हो हाच तो धोकादायक गेम ज्याने जगभरात खळबळ माजवली होती. भारतात या गेमचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत मनप्रित सिंग या मुलाने टास्क पूर्ण करण्यासाठी आत्महत्या केली होती. यानंतर भारतभर अनेक घटना पाहायला मिळाल्या होत्या. यामुळे केंद्र सरकारने या गेमवर भारतात बंदी आणली होती. त्यामुळे मध्यंतरी हा गेम खेळण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, या गेमने पुन्हा डोके वर काढल्याचे पाहायला मिळाले असून या गेममुळे नागपुरात एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

नागपुरात राहणारी ही १७ वर्षाची मानसी जोनवाल मागील तीन महिन्यांपासून ब्लू व्हेल गेम खेळत होती. या गेमचा शेवटचा टास्क पूर्ण करण्यासाठी तिने आपल्या हाताची नस कापून आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीचे वडील एअरफोर्समध्ये हवालदार आहेत. मानसीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, ब्लू व्हेल चॅलेंज हा गेम रशियातून जगभरात व्हायरल झाला होता. आत्तापर्यंत या गेममुळे जवळपास २०० पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@