अहमदनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |



अहमदनगर : सध्या नगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. भाजपदेखील २०१८ च्या या महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या ताकतीने उताराला आहे. प्रचार संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक असून भाजपच्या प्रचार मोहिमेची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेने होणार आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता गांधी मैदानात भाजपने विराट विजय संकल्प सभेचे आयोजन केले असून या सभेला मा. मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत.

 

२०१८च्या महानगरपालिकेच्या प्रचार मोहिमेत भाजपने दिग्गज मंत्र्यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले होते. भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाली होती. अशातच ७ डिसेंबरला खुद्द मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. त्यामुळे या सभेकडे नागरकरांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येत्या ९ डिसेंबरला नगर महापालिकेसाठी मतदान होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@