तळोद्यात भोई समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 
तळोदा : 
 
भोई समाजाचा राज्यस्तरीय मेळावा माळी समाज मंगल कार्यालयात उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात संत श्री भीमा भोई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
 
यावेळी आ. उदेसिंग पाडवी म्हणाले की, मला अभिमान वाटतो की तळोदा येथे भोई समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. भोई समाज हा भटकंती करून आपला उदरनिर्वाह करणारा समाज आहे.
 
वधू-वर परिचय मेळावा ही काळाची गरज आहे. शहादा येथील नरेंद्र वाडिले यांनी मुली जन्माचा सत्कार या उपक्रमाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. ते म्हणाले की, नरेंद्र वाडिले यांनी मुली जन्माच्या सत्कारावेळी 3100 रुपयांची डिपॉझिट रक्कम देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवल्याचे सांगितले. त्यांनी मेळाव्याला 21 हजारांची देणगी जाहीर केली.
 
 
यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, भोई समाजाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. हिरामण मोरे, नगरसेवक गौरव वाणी, भटके विमुक्त हक्क परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुपडू खेडकर, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले यांनी मनोगत व्यक्त केले.परिचय मेळाव्यात 105 मुला-मुलींनी परिचय दिला. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.
  
यावेळी आ. उदेसिंग पाडवी, नगराध्यक्षा अजय परदेशी, भोई समाजाचे प्रदेशध्यक्ष डॉ. हिरामण मोरे, धडगावचे नगराध्यक्ष सुरेखा मोरे, नगरसेवक संजय साठे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले, नगरसेविका शोभाबाई भोई, सारंगखेड्याचे सरपंच सुशीलाबाई मोरे, कार्याध्यक्ष जयवंत खेडकर, भुता भोई, हिरकन भोई, राजेश हिरकन भोई, रमेश भुता भोई, परिचय समितीचे अध्यक्ष धनलाल भोई, संतोष वानखेड़े, जालंधर भोई, तळोदा तालुकाध्यक्ष शिवदास साठे, जगदीश वानखेड़े, चंद्रकांत साठे, प्रा. रवींद्र वानखेड़े आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी भोई समाज युवक मंडळाने परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन प्रकाश वानखेड़े व चंद्रकांत भोई यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@