शहादा येथे आज हुंकार सभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

तरुणाईत उत्साह : जिल्हाभरातून येणार हजारो राम भक्त


नंदुरबार : 
 
देशपातळीवर हिंदू समाजात राम मंदिर निर्माणाबाबत जाणीव जागृती करून केंद्र सरकारने राम मंदिर निर्माणाबाबत संसदेत कायदा करून भव्य श्रीराम मंदिर निर्माणाचा अध्यादेश आणावा, याकरिता साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देशातील विविध जिल्ह्यात 500 हुंकार सभांचे आयोजन करण्यात आले असून ,
 
नंदुरबार जिल्ह्यातदेखील हुंकार सभेचे आयोजन 5 डिसेंबर बुधवार रोजी शहादा येथील स्टेट बँकसमोरील जुने मोहिदा रोड येथे सायंकाळी 5.30 वाजता आयोजन करण्यात आले असून सभेची तयारी पूर्ण झालेली आहे.
 
प.पू.ह.भ.प.खगेंद्रजी महाराज, वि.हिं.प.केंद्रीय मंत्री विदेश विभाग तथा प्रमुख वक्ते प्रशांतजी हरताळकर, प. पू. जिज्ञासा दीदी (कोठली), प. पू. जनार्दन महाराज (आरावे), प.पू.संजूनाथ महाराज (तोरणमाळ), प.पू.श्री दत्त महाराज (समशेरपूर), प.पू.गोविंद महाराज (धडगाव) आदी प्रमुख संतांची उपस्थिती लाभणार असून 5 डिसेंंबर बुधवार रोजी दुपारी 3.30 वाजता श्रीराम मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे.
 
परिसरातील भजनी मंडळी यात सहभागी होणार आहेत. गेल्या महिनाभरापासून विविध प्रकारच्या दहा समित्यांच्या माध्यमातून या सभेची तयारी करण्यात आली असून सभा सुरळीत होण्यासाठी 200 स्वयंसेवक मदतीला राहतील.
 
भव्य राम मंदिर निर्माण हेतू सकल हिंदू समाजाने एकत्र येणे गरजेचे असून हजारोंच्या संख्येने उपस्थितीचे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने जिल्हाध्यक्ष जत्र्याकाका पावरा, जिल्हामंत्री विजय सोनवणे, प्रांत उपाध्यक्ष घनश्याम धनकानी, धर्मप्रसार प्रांत प्रमुख दादा शिनगर, धर्मप्रसार प्रांत सत्संग प्रमुख पुरुषोत्तम काळे, जिल्हा सहमंत्री डॉ.सचिन भदाणे, जिल्हा कार्याध्यक्ष अजय कासार, जिल्हा उपाध्यक्ष केवलसिंग राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रसिंग गिरासे, बजरंग दल विभाग संयोजक अ‍ॅड.रोहन गिरासे, जिल्हा संयोजक प्रा. संग्रामसिंग राजपूत, हुंकार सभा प्रमुख राजाभाऊ साळी, सहप्रमुख लालाभाई पाटील, जिल्हा सहसंयोजक केशव पाठक, विवेक चौधरी, राधेश्याम निकम, विश्वजित खैरनार, गुड्डू पवार, प्रदीप चौधरी, राजाभाऊ पानपाटील, विजूभाऊ लाडकर आदींनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@