कॉंग्रेसच्या चुकीमुळे देश करतारपूरला मुकला : मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

  

हनुमानगड : करतारपूर स्थित गुरुद्वारावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर चोख प्रत्युत्तर दिले आहे. राजस्थानमध्ये हनुमानगड येथे प्रचारसभेदरम्यान त्यांनी कॉंग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
 

फाळणीवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवले असते तर करतारपूर पाकिस्तानात गेले नसते. असा हल्लाबोल त्यांनी कॉंग्रेसवर चढवला, त्यांच्यावर टीका करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. पाकिस्तानमध्ये स्थित करतारपूर गुरुद्वारावरून काही दिवसांपासून विरोधक सरकारवर टीका करत होते. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर उत्तर दिले. फाळणीवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवले असते तर करतारपूर भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानात गेले नसते, असे त्यांनी सांगितले.

 

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी पंतप्रधान मोदींनी हनुमानगडमध्ये जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी करतारपूर गुरुद्वारावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तानातील करतारपूर दौऱ्यामुळे प्रकरण चांगलेच तापले होते. काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पाकिस्तानात सौम्य धोरण अवलंबणाऱ्या सिद्धूंवर भाजपने हल्ला केल्यानंतर सिद्धूंनीही थेट मोदींवर टीका केली होती. सिद्धूंच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. सत्तेसाठी काँग्रेसने केलेल्या सर्व चुकांची शिक्षा इतर सरकारांना भोगायला लागत आहे. काँग्रेसने केलेल्या चुका सुधारण्यातच आमचा वेळ जात आहे., असे त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@