सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |

आरएन पार्क जवळील घटना, संतोष पाटील गंभीर जखमी


जळगाव, ३१ डिसेंबर
जळगाव येथील सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक संतोष मोतिराम पाटील (वय ५१) हे सकाळी शेतात जात असताना मागून येणार्‍या दुचाकीवरील अज्ञात दोघांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी सकाळी १०.४५ दरम्यान घडली. या गोळीबारात ते जखमी झाले असून त्यांच्यावर सहयोग क्रिटीकल्समध्ये उपचार सुरु आहे.
 
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन, शहरातील पाटील हे वाघनगर भागात वास्तव्यास आहेत. पत्नी नगरसेविका उषाबाई पाटील आहेत. पाटील हे सकाळी घरुन दुचाकीने ते शेतात नेहमीप्रमाणे जात होते. दरम्यान मागून दुचाकीवरुन येणार्‍या दोघांनी त्यांच्यावर गोळी झाडली. दरम्यान ते जमीनीवर कोसळले असता त्यांनी आपला मुलगा दीपक पाटील याच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. थोड्याच वेळात दीपक हा घटनास्थळी आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. नंतर त्यांना शहरातील सहयोग क्रिटीकल्स्मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळी पाटील यांच्या शरीरातून निघून गेली आहे. याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
 
 
पूर्व वैमनस्यातून गोळीबार?
संतोष पाटील यांच्यावरील गोळीबार हा पूर्व वैमनस्यातून झाला असावा अशी चर्चा आहे. त्यांचा वाळूचा व्यवसाय आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारी त्यांनी काही दिवसापूर्वी पोलिसांत केलेल्या होत्या. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरलेले आहे. पोलिसांकडून रस्त्यावरील आणि हॉस्पिटल व दुकाने यांच्यावर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी सुरु आहे.
 
 
सिव्हिल, क्रिटीकल्समध्ये पोलिसांचा दांडगा बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटल गाठले. यानंतर सहयोग क्रिटीकल्समध्ये पाटील यांना दाखल केले असता. याठिकाणी मोठा जमाव गोळा झाला होता. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचा दोन्हीही ठिकाणी दांडगा बंदोबस्त होता. तेथे माजी महापौर ललित कोल्हे व नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होते.
 
 
कारवाई झाली असती तर गुन्हा घडला नसता :- आ. सुरेश भोळे
पाटील यांनी वारंवार पोलिसांकडे सूचना आणि तक्रारी दिल्या होत्या. परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. याचे गांभिर्य समजून पोलिसांनी कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती, असे आ. सुरेश भोळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. भविष्यात अशा प्रकारे कुठलेही तक्रार किंवा सूचना आल्यास पोलिसांनी त्यावर तत्काळ कारवाई करावी असे ते म्हणाले.
 
 
सुपारी देवून घातपात :- दीपक पाटील
कौटुंबिक वादात ही घटना घडली आहे. याची कल्पना एक महिन्यापूर्वी मला होती. तसेच पोलिसांनाही याबाबत माहिती दिली होती. दरम्यान वातावरण शांत झाले असल्याने ते एकटे घराबाहेर पडले होते. बुधा हटकर यांचा मुलगा कैलास हटकर याने सुपारी देवून हा घातपात केला असल्याचा आरोप दीपक पाटील यांनी केला.
@@AUTHORINFO_V1@@