भिवंडीत कपड्याच्या फॅक्टरीला आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
ठाणे : ठाणे येथील भिवंडीमधील एका कपड्याच्या फॅक्टरीला सोमवारी सकाळी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र या भीषण आगीमध्ये किती नुकसान झाले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
 

ही कपड्याची फॅक्टरी सरवली एमआयडीसीत असून उजागर डाईंग असे तिचे नाव आहे. या भीषण आगीमध्ये १२ ते १३ डाईंग जळून खाक झाले आहेत. भिवंडी, कल्याण, एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या गाड्या येथे दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईतील अग्निकल्लोळाचे सत्र सुरुच आहे. मुंबई आणि मुंबईच्या परिसरात गेल्या १५ दिवसांमध्ये अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. चेंबूरच्या टिळकनगर परिसरात ४ दिवसांपूर्वी एका रहिवासी इमारतीला आग लागली होती. शुक्रवारी भिवंडीतील एका भंगार गोदामालादेखील भीषण आग लागली होती. या भीषण आगीमध्ये त्या गोदामासह त्याशेजारील दुकान आणि दुचाकी जळून खाक झाली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@