जगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018   
Total Views |

 

 
 
 
 
 
विमान कंपनीतील ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले. बोगस पदवी वापरून, विमान कंपनीमध्ये मिळवलेल्या, आयत्या नोकरीचा फुकाचा अभिमान हे कर्मचारी त्यांच्या उराशी बाळगून होते.  
 
 
सुशिक्षित असाल, पदवीधर असाल, तर पोटापाण्याचा प्रश्न सहजपणे सोडवता येतो. उच्चशिक्षित असाल, तर नोकरीत पदोन्नतीचे मार्ग मोकळे होतात. एखाद्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून पदवी संपादन केली असेल, तर तो दुग्धशर्करा योगच मानला जातो. मात्र, याच शिक्षणावरुन पाकिस्तानातील राष्ट्रीय विमान कंपनीची नुकतीच पोलखोल झाली. विमान कंपनीतील ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले. बोगस पदवी वापरून, विमान कंपनीमध्ये मिळवलेल्या, आयत्या नोकरीचा फुकाचा अभिमान हे कर्मचारी त्यांच्या उराशी बाळगून होते. विशेष म्हणजे, या विमान कंपनीतील सात वैमानिकांची पदवी बोगस असल्याचे सत्य उघडकीस आले आहे. त्यापैकी पाच वैमानिक हे इयत्ता दहावीही पास नाहीत. मग त्यांनी कसे आणि आकाशात किती उंच विमान उडवले असेल? याची कल्पनादेखील करवत नाही. विमान प्रवाशांच्या जीवाशी चाललेला हा खेळ न जाणो, किती दिवस खेळला जात होता. सगळ्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक, वैचारिक आणि बौद्धिक कुवत एकसारखीच होती. त्यामुळेच हे अर्ध्या शेकड्यापेक्षा जास्तीच्या संख्येने असलेले कर्मचारी अळी मिळी गुप चिळी राखून होते. हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यामुळे इतर ४०० कर्मचाऱ्यांच्या तरी पदव्या खऱ्या आहेत का? याची तपासणी सध्या सुरू करण्यात आली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या खोट्या वर्तणुकीमुळे संशयाची सुई इतर सर्व कर्मचाऱ्यांकडे फिरली. विनाकारण त्यांना त्रास, असे देखील बोलू शकत नाही. कारण, पुढील तपासात जर त्या ४०० च्या ४०० कर्मचाऱ्यांच्या पदव्या बोगस निघाल्या तरी त्याचेदेखील मोठे नवल वाटणार नाही. कारण, मुळात पाकिस्तानची वृत्तीच बोगस आहे. यावरून पाकिस्तानात नेमके कोणत्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण हे किमान शिक्षण मानले जाते. याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते. या बोगस पदवीधर कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणाऱ्या पाकिस्तानची अक्कल इथेच दिसून येते. हा अनुचित प्रकार पाकिस्तानातील इतर कोणत्याही खासगी विमान कंपनीत घडला असता, तर गोष्ट वेगळी होती. कारण, पाकिस्तान सरकारला त्यावर तसेच बोगस स्पष्टीकरणही देता आले असते. परंतु, पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी (पीआयए) मध्येच हा बोगसपणा घडल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना आपल्याच माणसांनी मुस्काटात मारल्यासारखे झाले आहे. साधी सरळ गोष्ट आहे, ज्या देशात एक क्रिकेटपटू पंतप्रधान होऊ शकतो, त्या देशात विमान चालविण्यासाठी शिक्षणाची काय गरज?
 

आपल्याकडे भारतात याउलट आहे, जेव्हा एखादे लहान मूल मोठेपणी वैमानिक बनण्याची इच्छा आपल्या आईवडिलांजवळ बालपणीच व्यक्त करते. तेव्हा त्याला ‘वैमानिक होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो,’ अशी भीती घातली जाते. त्या भीतीपोटीच आणि भलामोठा अभ्यासक्रम पाहूनच ते लहान मूल करिअरचा दुसरा पर्याय शोधू लागते. तसेच त्या दृष्टीने विचारही करू लागते. ही आपल्याकडची मानसिकता आहे. पण, ती तरी बरी म्हणावी लागेल. कारण, आपण फसवणुकीचा खोटा मार्ग मुलांना दाखवत नाही. पाकिस्तानात मात्र याउलट चित्र पाहायला मिळते. तेथील पालक आपल्या मुलांना अभ्यास झेपत नसेल, तर बोगस पदवी मिळवून देण्यास आर्थिक पाठबळ देतात. आर्थिक बाजू मजबूत नसेल, तर आपल्या मुलांना दहशतवादी बनवणे, हा नेहमीचा आणि तेथील अनेक कुटुंबे स्वीकारत असलेला पर्याय पाकिस्तानी पालकांजवळ उपलब्ध असतोच. वैमानिक होण्याचे स्वप्न साकारता येणार नाही, म्हणून ते निराश झालेले भारतीय लहान मूल कागदाचे विमान हवेत उडवण्यातच धन्यता मानते. आकाशातील विमानांकडे आयुष्यभर हताश होऊन पाहत राहणेच त्याच्या नशिबी येते. मात्र, शैक्षणिक पदवीला कागदाचा चिटोरा मानणारे पाकिस्तानातील तरुण, बोगस पदवीचा आधार घेऊन उंच आकाशात भरारी घेतात. पण खोट्याच्या कपाळी गोटा म्हणतात ना तेच खरे! खोट्या पार्श्वभूमीवर अवकाशात घेतलेली ही झेप त्यांना क्षणात जमिनीवर आणून सोडते. हा एवढामोठा खोटेपणा केलेले आणि बडतर्फ झालेले हे वैमानिक आणि कर्मचारी पुढे जाऊन बेरोजगारीमुळे दहशतवादीबनले तरीदेखील नवल वाटायचे नाही. पण भारतीय जवानांकडून त्यांचा खात्मा होईलच!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@