भिवंडीत पुन्हा जाळीतकांड ; ६ दुचाकी १ रिक्षा जळून खाक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |



ठाणे :- भिवंडी शहरात दुचाक्यांना आगी लावण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी शहरात ६ दुचाक्या आणि १ रिक्षा यांना जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये वाहने जळून खाक झाली आहेत. ३ महिन्यातील ९ वी जळीत कांडाची घटना शहरात घडली आहे. भिवंडी शहरातील अंजूर फाटा या परिसरात असलेल्या वाहतूक पोलीस चौकीच्या मागील बाजूस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची माहिती उघडकीस आली आहे. वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या ६ दुचाक्यांसह १ रिक्षा जळून खाक झाले आहे.

 

भिवंडी शहरात घरासमोरील आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाक्यांना अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी पोहोचली आणि तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. विशेष म्हणजे या दुचाक्या पोलिसांनी जप्त करून वाहतूक पोलीस चौकीच्या देखरेखीत अंजूरफाटा पोलीस चौकीच्या मागे ठेवल्या होत्या. मात्र, तरीही दुचाक्यांना अज्ञात व्यक्तीने आग लावली. दरम्यान, पोलिसांच्या आवारातील गाड्या जर सुरक्षित नसेल तर शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या दुचाक्या सुरक्षित कशा राहतील असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@